धक्कादायक! ऑक्सिजन प्रेशर कमी झाल्याने एकाच रुग्णालयातील २० रुग्णांचा पुन्हा मृत्यू

https://twitter.com/ani/status/1385811423264075779?s=21

नवी दिल्ली 24– महाराष्ट्रातील नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीमुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना राजधानी दिल्लीतती ऑक्सिजनसाठी रुग्णांचा जीव गेला आहे. कोरोनाच्या चौथ्या लाटेचा सामना करत असलेल्या दिल्लीत भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. दिल्लीत नाशिकच्या घटनेच्या स्मृती जाग्या करणारी घटना घडली आहे. ऑक्सिजन प्रेशर कमी झाल्याने एकाच रुग्णालयातील २० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दिल्लीत कोरोनामुळे मृत्यूचं तांडवच सुरू आहे. दिल्लीत ऑक्सिजनअभावी २० रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच जयपूर गोल्डन हॉस्पिटलमध्ये आणखी २० रुग्णांचा ऑक्सिजनचा दाब कमी झाल्यानं मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. रुग्णालय प्रशासनाने या घटनेला दुजोरा दिला आहे.

ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होऊन ऑक्सिजनचा दाब कमी झाल्याने शुक्रवारी रात्री २० रुग्णांचा मृत्यू झाल्याचं रुग्णालयाचे डी.के. बालुजा यांनी सांगितलं आहे. सध्या २६० रुग्ण उपचार घेत असून, वेळीच ऑक्सिजन मिळाला नाही, तर त्यांचे प्राण जाऊ शकतात अशी भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे.

Share