अशोक दौलतराव बनकर गोंदियाचे नवे अप्पर पोलीस अधीक्षक

अशोक बनकर

13 सहाय्यक पोलिस आयुक्तांना पदोन्नती-बदल्या, पुण्यातील 2 सहाय्यक आयुक्तांचा समावेश

मुंबई 23 : राज्यातील 13 पोलिस उप अधीक्षक / सहाय्यक पोलिस आयुक्त यांना पोलिस अधीक्षक/ पोलिस उप आयुक्त (असंवर्ग) म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. दरम्यान, भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) अतुल कुलकर्णी यांची अप्पर पोलिस अधीक्षक (गोंदिया) या पदावरून अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रपूर येथे बदली करण्यात आली आहे. पदोन्नतीवरून बदली झालेल्या अधिकार्‍यांची नावे आणि त्यापुढील कंसात सध्याचे ठिकाणी आणि पदोन्नतीनंतरचे ठिकाण पुढील प्रमाणे:

1. वैशाली विठ्ठल शिंदे (सहाय्यक आयुक्त, पुणे शहर ते अप्पर अधीक्षक, लोहमार्ग, नागपूर)

2. अभय मुलचंद डोंगरे (सहाय्यक आयुक्त (गुन्हे), सोलापूर शहर ते प्राचार्य, पोलिस प्रशिक्षण केंद्र जालना)

3. वैशाली उत्तमराव माने (अप्पर अधीक्षक, भरारी पथक, सीआयडी, पुणे ते पोलिस उपायुक्त (मुख्यालय), अमरावती)

4. रूपाली पोपटराव दरेकर (सहाय्यक आयुक्त (वाहतूक), सोलापूर शहर ते पोलिस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, औरंगाबाद)

5.अनिता दिलीपराव जमादार (अप्पर अधीक्षक, अ‍ॅन्टी करप्शन, औरंगाबाद ते पोलिस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक, औरंगाबाद)

6. किशोर मोहन काळे (पोलिस उप अधीक्षक (मुख्यालय), सांगली ते प्राचार्य, पोलिस प्रशिक्षण केंद्र, धुळे)

7. अमोल भाऊसाहेब झेंडे ( सहाय्यक आयुक्त (एसबी), नवी मुंबई ते पोलिस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, ठाणे)

8. प्रदीप वसंतराव जाधव (सहाय्यक आयुक्त (विभाग-1), नाशिक शहर ते अप्पर अधीक्षक, महाराष्ट्र पोलिस अकादमी, नाशिक)

9. अशोक दौलतराव बनकर (सहाय्यक आयुक्त (एसबी), औरंगाबाद ते अप्पर अधीक्षक, गोंदिया)

10. डॉ. शिवाजी पंडीतराव पवार (सहाय्यक आयुक्त (आर्थिक व सायबर गुन्हे) पुणे शहर ते अप्पर अधीक्षक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक)

11. रमेश मल्हारी धुमाळ (अप्पर अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई ते सहाय्यक महानिरीक्षक (नि.व स.), पोलिस महासंचालक कार्यालय, मुंबई)

12. अशोक रमेश थोरात (उपविभागीय अधिकारी, पाटण उपविभाग, सातारा ते प्राचार्य, पोलिस प्रशिक्षण केंद्र अकोला)

13. अशोक नखाते (सहाय्यक पोलिस आयुक्त, नाशिक शहर ते उप संचालक, डी.टी.एस. (गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालय), नाशिक)

Print Friendly, PDF & Email
Share