गोंदियाचे अप्पर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे चंद्रपूर येथे स्थानांतरण

देवरी 23- गोंदियाचे अप्पर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे आज चंद्रपूर येथे स्थानांतरण करण्यात आले आहे.

राज्य शासनाचे गृहविभागाने आज श्री. अतुल कुलकर्णी यांच्या स्थानांतरणाचा आदेश जारी केला असून तशी कार्यवाही करण्याच्या सूचना पोलिस महासंचालकांना केल्या आहेत.

श्री अतुल कुलकर्णी हे सध्या गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथील पोलिस उपमुख्यालयाचा कारभार पाहत होते. श्री. अतुल कुलकर्णी यांचा कार्यकाल जिल्ह्यात एकंदरीत उत्तम राहिला असून त्यांनी नक्षल चळवळीवर चांगले नियंक्षण मिळविले होते. पोलिस विभागातील एक उत्तम प्रशासकीय अधिकारी म्हणून ते गोंदियाकरांच्या स्मृतीत राहतील.

Share