महाराष्ट्र: कडक लॉकडाऊन

काय आहे नवी नियमावली:

  • मुंबई लोकल आणि मेट्रो सामान्य लोकांसाठी बंद, केवळ अत्यावशक सेवेतील लोकांनाच परवानगी
  • मोनो प्रवास पूर्णपणे बंद
  • लग्न समारंभात नियंमांचं उल्लंघन केल्यास 50 हजार दंड
  • लग्नात फक्त 25 लोकांना परवानगी. एकाच हॅालमध्ये 2 तास कार्यक्रम
  • आंतरजिल्हा प्रवास फक्त महत्त्वाच्या कारणांसाठी
  • जिल्हा बंदीचा निर्णय जाहीर
  • खासगी गाडीत प्रवास 50 टक्के क्षमतेने
  • सरकारी कार्यालय 15 टक्के क्षमतेने
  • खासगी बसेस 50 टक्के क्षमतेने
  • बाहेरून येणाऱ्या लोकांना १४ दिवस Quarantine व्हावे लागणार

राज्यातील ऑफिसेसबाबत नवे नियम काय सांगतात?

1. सर्व सरकारी कार्यालयांमध्ये केवळ 15 टक्के कर्मचारी हजर राहू शकणार. यात केवळ कोरोना नियंत्रणातील अत्यावश्यक सेवेला सूट असेल.

2. इतर सर्व कार्यालयांमध्ये 5 कर्मचारी किंवा 15 टक्के कर्मचाऱ्यांनाच हजर राहता येणार.

3. अत्यावश्यक सेवेतील कार्यालयांमध्ये 50 टक्के कर्मचाऱ्यांना काम करता येणार. मात्र, आवश्यकतेनुसार या ठिकाणी 100 टक्क्यांपर्यंत कर्मचारी वाढवता येणार.

Share