धक्कादायक…! देवरीतील कोरोना निगेटिव्ह रुग्णाची पॉजिटीव्ह रिपोर्ट सांगून केली कोवीड सेंटरला रवानगी
वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंता व्यक्त केली जात असतानाच गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
प्रहार टाईम्स|भुपेन्द्र मस्के
देवरी(गोंदिया), 18 एप्रिल : कोरोनामुळे राज्यातील स्थिती बिकट झाली असून आरोग्य सुविधांच्या अभावी लोकांचा जीव जात असल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळे चिंता व्यक्त केली जात असतानाच गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
देवरी येथिल परसटोला वार्डात राहणारे सचिन लालचंद भांडारकर कोविड१९ टेस्ट सेंटरला दि.१२ एप्रिलला तपासणी केली. अहवालाची विचारणा केल्यावर तिन दिवसात येईल असे सांगितले. त्यानंतर दि.१६ एप्रिल रोजी कोविड केअर सेंटर देवरी येथून डॉ.अमोल पाटील यांचा भ्रमनध्वनी सचिनला आला. सांगितले की, तुम्ही कोरोना पाॅजिटिव्ह आहात. यावर रिपोर्टची मागणी केल्यावर माझ्याकडे पाॅजिटिव्ह असल्याचे रिपोर्ट आहे पण तुम्हाला देऊ शकत नाही असे बोलुन धमकी देऊन बोलू लागले कि, तुम्ही कोरोना पाॅजिटिव्ह आहात, तुम्ही ईकडे तिकडे दिसले तर तुमच्यावर गुन्हा मी स्वतः करेन यावर सचिनने आपली रवानगी कोविड १९ विलगीकरण कक्ष देवरी येथे केली. तिथेही रिपोर्टची मागणी केल्यावर देण्यात आली नाही. जवळपास दोन दिवस उपचार सुरू असतांनीच दि.१७ एप्रिलला सायंकाळी ६.०० वाजता सचिनची रिपोर्ट निगेटिव्ह आहे म्हणून लगेच त्यांना सुट्टी देण्यात आली. सदर घटनाक्रमामुळे सचिनला मोठ्या शारिरीक व मानसिक कष्टातून जावे लागले. परिणामी कोविड सेंटरमधुन दिलेल्या औषधांच्या दुष्परिणामाच्या भितीने सचिनला पार पोखरुन टाकले आहे.
डॉ.अमोल पाटील यांनी निगेटिव्ह व्यक्तिस पाॅजिटिव्ह दाखवून माझ्या जिवाशी निष्काळजीपणा केला व मला कोरोना पाॅजिटिव्ह रूग्णाच्या सहवासात राहण्यास भाग पाडले. त्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांना जबाबदार डॉ.पाटील राहतील. तसेच त्यांचे काका सुरेश गोपाळराव भांडारकर हे कोरोना बाधित असुन डॉ.पाटिल यांच्या निष्काळजीपणा कुठलेही वैद्यकीय उपचार होऊ शकले नाही.परिणामी भांडारकर कुटुंबातील सदस्य धोक्यात आहेत.सदर बेजबाबदार प्रकरणाची तक्रार पोलीस स्टेशन देवरी येथे करून डॉ.अमोल पाटील आणि संबंधित विभागाचे अधिकारी यांचेवर कारवाई करण्याची मागणी सचिन भांडारकर यांनी केली आहे.
प्रहार टाईम्सचे संपादक डॉ. सुजित टेटे यांनी वरिल प्रकरणाची अधिक माहितीसाठी कोविड केअरचे डॉ. अमोल पाटील व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.ललित कुकडे यांच्याशी संपर्क केला असता यांनी भ्रमणध्वनीवर झालेल्या प्रकरणाची माहिती दिली.
“पोज़िटिव रुग्णांची मला यादी प्राप्त झाली होती , यादी नुसार माझे काम पॉसिटीव्ह आलेल्या रुग्णांना संपर्क करून विलगीकरण व कोवीड केंद्रात भरती करण्याचे आहे .पॉसिटीव्ह रुग्णांच्या यादीत सदर निगेटिव्ह रुग्णाचं नाव कस आलं याची माहिती डॉ. ललित कुकडे तालुका वैद्यकीय अधिकारी हे देतील.”
-डॉ. अमोल पाटिल (CHO) देवरी
” आमच्या वर कामाचा खूप मोठा ताण आहे. एका घरातील 2 व्यक्ती ची कोरोना चाचणी करण्यात आली होती . एकच मोबाईल क्रमांक दिल्यामुळे निगेटिव्ह आलेल्या व्यक्तीला पॉसिटीव्ह सांगण्यात आले आले . कामाचे ताण असल्यामुळे मोठी चूक झाली. “-डॉ. ललित कुकडे (तालुका वैद्यकीय अधिकारी देवरी )
“सदर घटनेची लेखी तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आलेली असून घडलेल्या प्रकरणाची चौकशी केली जाणार.” -सुजित चव्हाण , प्रभारी पोलीस निरीक्षक पो स्टे देवरी
एकीकडे कोरोना रुग्णांची मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना असे धक्कादायक प्रकार घडत असतील तर संसर्गाची साखळी तुटणार कशी, असा प्रश्नही आता विचारला जात आहे.