देवरीच्या तहसीलदारांनी केला दोन दुकानांना दंड
प्रत्येकी १० हजाराचा दंड कोरोनाचे नियम न पाळल्याचा भूर्दंड
देवरी 18: कोरोनाचा उद्रेक झपाट्याने होत असतांना जिल्हा प्रशासनाने कोरोनाचे नियम पाळत अत्यावश्यक दुकाने सुरू ठेवण्याची मूभा दिली आहे परंतु किराणा दुकानदारही आपल्याला सूट मिळाल्याचे गृहीत धरून मनमर्जी कारभार करीत आहेत. कोरोनाचे नियम न पाळत दुकान चालविणाऱ्या सावली येथील दोन दुकानदारांना प्रत्येकी १० हजाराचा दंड ठोठावला आहे.
देवरी येथील तहसीलदार विजय बोरूडे यांनी या दोन्ही दुकानांवर दंड केला आहे. १८ एप्रिल रोजी देवरी तालुक्याच्या सावली येथील गोविंद असाटी यांच्या गोविंद किराना स्टोअर्समध्ये कोरोनासाठी घालून दिलेले नियम दुकानदाराने पाळले नाही. तसेच सावली येथील मुकेश किराना दुकानात कोरोना नियमाचे उल्लंघण केल्यामुळे त्या दोन्ही दुकानदारांना प्रत्येकी १० हजार असा २० हजाराचा दंड ठोठावला आहे. ती रक्कम शासन जमा करण्यात आली आहे.