माजी आमदार संजय पुराम कोरोनावर मात करून घरी परतले

देवरी 19: कोरोनाने संपूर्ण देशात थैमान घातले असून याचा फटका शहरी आणि ग्रामीण भागातही बघायला मिळतो.

नुकतेच आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार संजय पुराम आणि त्यांच्या धर्मपत्नी माजी बालकल्याण सभापती सविता पुराम कोरोना वर मात करून घरी परतले आहेत. सोशल मीडिया च्या माध्यमातून त्यांनी घरी सुख रूप परतल्याची माहिती दिली असून त्यांचे स्वास्थ ठीक असून 1 महिना आराम करायला डॉक्टरांचा सल्ला असल्याचे सांगितले.

कोरोना विषाणू ने बाधित झाल्यानंतर गोंदिया च्या एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यावेळी जेवणाचा डब्बा पुरविल्या बद्दल भावना कदम यांचा आभार मानला असून डॉ. बजाज आणि त्यांच्या संपूर्ण टीम चा आभार मानला असल्याचे सोशल मीडिया पोस्ट करून सविता पुराम यांनी आपल्या कार्यकर्ते आणि मित्र परिवाराला कळविले आहे.

Share