आमदार कोरोटे यांच्या पुढाकाराने रक्तदान शिबिराचे आयोजन

. नानाभाऊ पटोले यांच्या आव्हानानुसार आमदार श्री.सहसराम कोरोटे यांच्या पुढाकाराने तालुका काँग्रेस कमिटी तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन.

आमगाव 17 –
आमदार नानाभाऊ पटोले प्रांताध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या आवाहनानुसार राज्यात गेल्या काही काळापासून कोरोनासदृश्य परिस्थितीत रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने जिल्ह्या व तालुका स्तरावर कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणावर रक्तदान करण्याचे आव्हान करण्यात आले होते. त्यातच सामाजिक बांधिलकी या नात्याने दिनांक ११ व १४ एप्रिल या रोजी राष्ट्रपिता ज्योतिबा फुले,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या जयंतीचे औचित्य साधून मा.आमदार श्री. सहसराम जी कोरोटे यांच्या पुढाकाराखाली तालुका काँग्रेस कमिटी तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक १६ एप्रिल २०२१ रोजी करण्यात आले.

यावेळी तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्यकर्त्यांतर्फे व तालुक्यातील समाज बांधवांतर्फे मोठ्या प्रमाणावर रक्तदान करण्यात आले. त्याबरोबरच या रक्तदान शिबिरामध्ये पक्षातील सर्व कार्यकर्त्यांनी हिरहिरीने भाग घेत रक्तदात्यांना फळ, ज्यूस, नारळ पाणी इत्यादी सोयीसुविधा यात कुठलीही कमतरता होऊ दिली नाही. रक्तदान शिबिराचे नियोजन व संचालन मा.संजय जी बहेकार तालुका अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी आमगाव यांच्या देखरेखीखाली सम्पन्न झाले.

यात सौ. छब्बुताई उके महिला काँग्रेस अध्यक्ष आमगाव, सर्वश्री मान्यवर अजय जी खेताण, जगदीश जी चुटे, सौ. ममताताई पाऊलझगडे, दयारामजी भोयर सर ,रामेश्वर जी श्यामकुवर, मा. सुनील जी पाऊलझगळे, महेश जी उके, राधेलाल जी रहांगडाले, प्रदीप जी खोटेले सरपंच, प्रशांत जी बहेकार उपसरपंच, शंकर जी रहांगडाले, इंजि. तारेंद्र रामटेके ,राजेश जी सातूरकर, नरेश जी बोपचे ,भैयालाल जी बावनकार,नंदू जी कोरे,अरविंद जी चुटे, रमेश जी गायधने, गणेश जी हुकरे ,पिंकेशजी शेंडे ,प्रशिक जी मेश्राम, सुरेश जी श्यामकुवर, कौशल जी हरिनखेडे, संदीप जी टेंभुर्णीकर व पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांनी हिरहीरीने सहभाग घेतला.
सोबतच रक्तदान शिबिराला डॉ. संजय जी चव्हाण सहयोगी प्राध्यापक विकृतीशास्त्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या चमुनि उत्स्फूर्तपणे वैधकीय सोई सुविधा दिली.

Share