परिवहन विभागामुळे ग्रामीण भागात टपाल सेवा विस्कळीत

लालपरीची गती मंदावताच, टपाल खाते रखडले…

गोंदिया 17- राज्यभर मोठ्या संख्येने करोनाची रुग्णवाढ होत असल्यामुळे करोनाची साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चैन या अभियानांतर्गत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 15 दिवसाची संचारबंदी व कडक निर्बंधाची घोषणा केली. याअंतर्गत सकाळी 7 ते रात्री 8 वाजे पर्यन्त फक्त अत्यावश्यक सेवा सुरू असल्याचे घोषित करण्यात आले.
यावेळी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद राहणार नसल्याचे सांगण्यात आले होते. लोकल सेवा तसेच बस सेवा अत्यावश्यक कामासाठी व जीवनावश्यक सेवा देणार्‍यासाठी सुरू राहील असे घोषित करण्यात आले होते.

कोरोना संसर्गामुळे बचत व्यवहार करणे जिकिरीचे झाले आहे. त्यावर उपाय म्हणून भारतीय डाक विभागाने बचत खात्यामार्फत इंटरनेट बॅंकिंग, मोबाईल बॅंकिंग सेवाही उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे ग्राहकांना घरबसल्या बॅंकिंग व्यवहार करणे शक्‍य झाले आहे. कोरोनाच्या अडचणीच्या काळात डाक खात्याने औषधे, उपकरणे, पोचवण्याची सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

अशावेळी पुन्हा लाॅकडाउन स्थिती निर्माण झालेमुळे प्रवाशी मिळत नसल्याचे कारण पुढे करून गोंदिया आगाराने ग्रामिण भागात लालपरीची फेरी बंद केली. त्यामुळे टपाल ग्राहकांचे महत्वाचे दस्ताऐवज डेपोतच पडुन असल्याचे चित्र आहे. देवरी तालुक्यासह ग्रामिण भागात तिनं दिवसांपासून डाक डाकघरात पोहोचलीच नाही. याकडे जिल्हाधिकारी गोंदिया यांनी लक्ष घालून डाक व्यवस्था सुरळीत सुरू करावी अशी मागणी ग्रामिण जनतेमधून येत आहे.

मागील ३ दिवसांपासून डाक गोंदियावरून परिवहन व्यवस्थेमुळे येत नसल्यामुळे हि गैरसोय होत आहे.
-विशाल भित्रे
पोस्टमास्तर,डाकघर देवरी.

शासनाच्या निर्देशानुसार अत्यावश्यक सेवेतील प्रवाशी देवरी येथे ये- जा करण्यास भेटत नसल्यामुळे परिवहन विभागाला डाक पाठविण्याकरीता वाहन पाठविणे शक्य नाही व परवडणारे नाही. व गोंदिया डेपोमध्ये पाच दिवसांपासून डिजेल येण्याची वाट पाहत आहोत.
-संजना कटरे
आगार व्यवस्थापक
गोंदिया

डाक व्यवहारामुळे जनसामान्यांचे कामे रखडली आहेत. ती लवकरात लवकर सुरू करावे -ग्राहक

Print Friendly, PDF & Email
Share