अविनाश राठोड यांच्यावर कारवाई न झाल्याने महामंडळ कर्मचाऱ्यांचा लेखनी बंद आंदोलन

या आंदोलनात आदिवासी विकास महामंडळ कार्यालय भंडारा, नवेगांव बांध व देवरी येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहभाग.

देवरी, ता.१३; आदिवासी विकास महामंडळ प्रादेशिक कार्यलय भंडारा येथे कार्यरत प्रभारी प्रादेशिक व्यवस्थापक अविनाश राठोड यांच्या कडून सतत अधिनिस्त असलेले कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या नाहक त्रासाबद्दल एका आठवड्यापुर्वी निवेदन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा आदिवासी विकास महामंडळ अध्यक्ष एड. के सी. पाडवी व व्यवस्थापकिय संचालक नाशिक यांना देवुन सुद्धा अविनाश राठोड यांच्यावर कशल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. सदर अधिकारी आम्हा सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना नकोसा झालेला आहे. तरी सदर अधिकारी यांच्यावर निलंबनाची किंवा सेवा मुक्त ची कारवाई तत्काळ करावी या मागणीला धरून आदिवासी विकास महामंडळ कार्यालय भंडारा, नवेगांव बांध व देवरी येथील अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्या केंद्रीय संघटनेच्या नेतृत्वात सोमवार(ता.१२ एप्रिल) रोजी लेखनी बंद आंदोलन करुण अविनाश राठोड यांच्या कृत्याबद्दल निषेध व्यक्त करुण व्यवस्थापकीय संचालक नाशीक, देवरीचे तहसीलदार व देवरी चे ठानेदार यांना निवेदना द्वारे माहिती दिली.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आदिवासी विकास महामंडळाचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या वारिष्ठान्ना तक्रार करूनही अविनाश राठोड यांच्या प्रव्रुत्ती मध्ये तिळमात्र ही सुधारणा झालेली नाही. सध्या तक्रार करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना द्वेषभावणेतून त्रास देने, काही कर्मचाऱ्यांना बदलीचे पत्र देने, व सुडभावणेतून वीणाकारण नोटिस देने असे षडयंत्र रचुन कारवाई करित आहेत. त्याचप्रमाणे रोजंदारीवर असलेले ६-७ वर्षापासून कार्यालयात प्रामाणिक पने सेवा देणाऱ्या संगणक सहाय्यक यांना कामावर येवू नका अशा तोंडी सूचना देवुन यांना कार्यलयातून हाकलून लावले आहे.
अविनाश राठोड यांच्या अशा कृत्यामुळे कार्यालयात अधिनिस्त असलेले इतर अधिकारी व कर्मचारी धास्तावले आहेत. त्यांच्या अर्वाच्चे भाषेत शिवीगाळ करुण अपमानित करण्याचा कृत्यापायी सर्व कर्मचारी मानसिक त्रासापोटी आजारी पडले असून सध्या ते रजेवर आहेत. या सोबतच कर्मचाऱ्यांवर दबाब टाकून त्यांच्या विरोधात केलेली तक्रार बाबत उलट सुलट लिहून घेणे असे कार्य सध्या भंडारा येथील प्रादेशिक कार्यालयात सुरु आहे.
अशाप्रकारे प्रादेशिक व्यवस्थापक अविनाश राठोड हे आपल्या पदाची प्रतिमा धुळीस मिळवित आहेत. तरी आपल्या अधिकाराचा अधिनिस्त असलेले अधिकारी व कर्मचारी यांच्या विरुद्ध ग़ैरवापर करुण सुडभावणेने कर्मचाऱ्यांसोबत वर्तवणुक करणाऱ्या अविनाश राठोड यांच्या विरुध्द तत्काळ आदिवासी विकास महामंडळ अधिनियमानुसार कारवाई करण्याची मागणी या निवेदनातून केली आहे.
निवेदन सादर केलेल्या पत्रात केंद्रीय कर्मचारी संघटनेचे विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वर चौधर, संघटनेचे सचिव सुनील भगत, केंद्रीय सल्लागार एस. के. बोरकर, कर्मचारी प्रतिनिधि अमोल धुर्वे यांच्या सह भंडारा, नवेगांव बांध व देवरी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या सहिचा समावेश आहे.

Share