गावी आहे पाण्याने भरलेले धरण पण गाव आहे तहानलेले
डॉ. सुजित टेटे
गाव आहे हिरवे गार पण प्यायला शुद्ध पाणी मिळणार का सवाल गावकऱ्यांचा ?
बघा सविस्तर रिपोर्ट :
गोंदिया 11: जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो . सर्वांना वाटतो तलावांचा जिल्हा आहे तर पाणीच पाणी असेल परंतु असे काहीच नाही .
गावात धरण आहे परंतु गावातील लोक जनावरे तहानलेली आहेत असे ऐकून धक्का बसणार ना ?
हो हे खरे आहे देवरी तालुक्यातील हे आहे ओवारा गाव. गावाच्या अवती भोवती छोटी मोठी तलाव व एक गावातच धरण आहे . धरण पाण्यानी भरून आहे पण येथील गावकरी , महिला , मुले व वयस्क नागरिक पाण्यासाठी वणवण भटकत आहेत .
गावात हातपंप आहेत ते पण सुकलेले , गावातील विहिरी आहेत ते पण आटलेले , शासनाच्या निधीतून गावात धरणाचे पाणी आणण्यासाठी नळयोजना आली परंतु नळयोजना महिना महिना पाणी पुरवठा करीत नसल्याने गावकऱ्यांवर पाण्याचा संकट निर्माण झाला आहे .
कोरोना संकटाबरोबर एक नवीन संकट उभं राहिलंय. एप्रिलच्या मध्यातच पाणी टंचाई भेडासावू लागलीय. त्यामुळे घोटभर पाण्यासाठी महिलांची वणवण सुरू झाली आहे.
गावकऱ्यांना जनावरे देखील पिणार नाही असे घाणेरडे पाणी पुरविले जात होते पण महिनाभरापासून विद्युत बिलाचा , ट्रान्स्फार्मर चा बहाणा सांगून लोकांना हाकलून लावण्याचे नागरिकांचे आरोप आहेत .
गावकऱ्यांच्या नशिबी अशुद्ध पाणी असून यातून काही आजार उद्भवण्याची शक्यता ग्रामस्थानी व्यक्त केली आहे. पाण्याचे साधे शुद्धीकरण देखील करण्यात येत नसून , लॅब टेस्टिंग साठी पाणी गेलेला असून रिपोर्ट मिळत नसल्याचे सरपंच यांनी सांगितले .
विद्युत ट्रान्सफरचं बहाणा सांगून प्रकरण ढकलण्याचे काम सरपंचानी केला असून विद्युत वितरण कंपनीच्या अभियंता पाटील यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी विद्युत पुरवठा सुरळीत असल्याचे सांगितले .
ओवारावाशियांची तहान भागेल का ?
यांच्या हक्काचा शुद्ध पाणी मिळणार का ?
हे सगळे प्रश्न निरुत्तरित आहेत .