नागझिरा व्याघ्रप्रकल्पाला लागलेल्या आगीत 3 मजुरांचा होरपळून मृत्यू तर 2 गंभीर जखमी.
प्रहार टाईम्स वृत्त
स.अर्जुनी 9: नागझिरा व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या पीटेझरी गेटला लागुन असलेल्या थाटेझरी या गावातील जगंलात काल गुरूवारी संध्याकाळी लागलेल्या आगीत तीन हंगामी मंजुरांचा होरपळून मृत्यू झाला आहे तर दोन मजूर आगीत गंभीररित्या जखमी झाले आहेत. या मजुरांवर नागपूर येथे उपचार सुरु आहेत.
याविषयी सविस्तर माहिती अशी की, व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या थाटेझरी गावातील जंगलात गुरूवारी सायंकाळी भीषण आग लागली.
यावेळी जंगलात काम करणाऱ्या तीन हंगामी मजुरांचा यात होरपळून मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले. विशेष म्हणजे आग विझविण्यासाठी बोलाविलेल्या अग्निशमन दलाच्या बंबाचाही स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हे गाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या कोर क्षेत्रात असल्याने वन्य जीवांनाही या आगीचा फटका बसून अनेक वन्य प्राणीही दगावल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मृतक व जखमी मजुरांची नावे-
दरम्यान मृतांमध्ये २४ वर्षीय राकेश मडावी, ४५ वर्षीय रेकचंद राने, २२ वर्षीय सचिन श्रीरगे यांचा समावेश आहे. तर जखमींमध्ये ४२ वर्षीय विजय मरसकोल्हे आणि २५ वर्षीय राजेश हराम यांचा समावेश आहे.