कोरोनावर केली 118 रूग्णांनी मात
नव्या 81 रूग्णांची नोंद दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू
आतापर्यंत आढळले 9049 बाधित रुग्ण
गोंदिया 22: जिल्ह्यात आज 22 ऑक्टोबर रोजी प्राप्त अहवालानुसार नवे 81 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले.118 रूग्णांनी औषधोपचारातून कोरोनावर मात केल्याने आज त्यांना सुट्टी देण्यात आली.गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे गोंदिया शहरातील 42 वर्षीय आणि 23 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
आज नवे 81 बाधित रुग्ण आढळले. तालुकानिहाय बाधित रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे. गोंदिया तालुका -46, तिरोडा तालुका -01, गोरेगाव तालुका -01,आमगाव तालुका-02, सालेकसा तालुका-04, देवरी तालुका- 01, सडक/अर्जुनी तालुका -05 आणि अर्जुनी/मोरगाव तालुका -21 रुग्ण आढळून आले.
आजपर्यंत आढळून आलेले बाधित रुग्ण तालुकानिहाय पुढीलप्रमाणे. गोंदिया तालुका -5205, तिरोडा तालुका -1123, गोरेगाव तालका- 372 ,आमगाव तालुका -627, सालेकसा तालुका -377, देवरी तालुका-412, सडक/अर्जुनी तालुका-379,अर्जुनी/मोरगाव तालुका-454 आणि बाहेर जिल्हा व इतर राज्यात आढळलेले- 100 रुग्ण आहे.असे एकूण 9049 रुग्ण कोरोना बाधित आढळले आहे.