प्रहार टाईम्सचा दणका- PM-Kisan योजनेचा लाभ घेणाऱ्या शासकीय कर्मचारी व करदात्यांचा शोध घेऊन कारवाही चे आदेश

भुपेंद्र मस्के यांनी मा. जिल्हाधिकारी यांचे कडे केली होती तक्रार

प्रहार टाईम्स ने केले होते वृत्त प्रकाशित 24 तासात कारवाहीचे आदेश

गोंदिया २२:

PM-kisan योजनेचा लाभ  यादीतून घटनात्मक पदावरील व्यक्ती (राष्ट्रपती, उप-राष्ट्रपती, पंतप्रधान, सरन्यायाधीश इ.) आजी-माजी लोकप्रतिनिधी (आमदार, खासदार, महापौर), आजी-माजी सरकारी कर्मचारी, करदाते, डॉक्टर, इंजीनियर्स, वकील, सनदी लेखापाल, वास्तुरचनाकार यांना या योजनेतून वगळण्यात आलं आहे. ह्याच बाबींचा शोध घेतला आणि चक्क शासकिय व निमशासकिय कर्मचारी व अनेक करदातेही या योजनेचा लाभ घेत असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते भुपेन्द्र मस्के यांनी जिल्हाधिकारी गोंदिया यांना केली होती. अशा लाभार्थ्यांची नावे या योजनेत आढळल्याने त्यांनी शासनाची दिशाभूल केली अशी तक्रार दाखल केली होती.
PM- Kisan योजनेत सरकारी व निमसरकारी कर्मचारी तथा करदाते लाभार्थी म्हणुन लाभ घेत आहेत अशा लाभार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना दिलेल्या लाभ निरस्त करून संबंधितांना वर कारवाई करण्याची मागणीही मस्के यांनी केली होती. यासंदर्भात प्रहार टाईम्स ने भुमेन्द्र मस्के यांच्याशी सवांद साधून वृत्त प्रकाशित केले होते.

24 तासाच्या आत सदर तक्रारीची दखल घेत मा.आर. एस. कुंभरे अधीक्षक जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया यांनी जिल्ह्यातील सर्व 8 तालुक्याचे तहसीलदार यांना  पत्र क्र- मं. अ./ स अ भु अ/ का वि/ 988/2020 दि 22-10-2020 नुसार PM-kisan योजनेत सरकारी, निमसरकारी कर्मचारी तथा करदाते लाभार्थी म्हणून लाभ घेत आहेत अशा लाभार्थ्यांचा शोध घेऊन लाभ निरस्त करून संबंधितांवर कारवाही करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

Share