जिल्ह्यात कोरोना स्फोट : आज 571 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
गोंदिया 7 : प्राप्त माहितीनूसार गोंदिया जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज जिल्ह्यात सकाळपर्यंत कोरोनाने गोंदिया शहरात विक्रमी 303 कोरोना रुग्णासह जिल्ह्यात 571 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे.
आजपर्यंत 18220 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे.
जिल्ह्यात आज 571 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्या रुग्णांची संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे.
गोंदिया-303,
तिरोडा-71, गोरेगाव-25,
आमगाव-22,
सालेकसा-20,
देवरी-15,
सडक अर्जुनी-78,
अर्जुनी मोरगाव-33
व इतर- 04 रुग्ण आढळून आले.
कोरोना वॉर रूममधून बाधित रुग्णांसाठी 24 तास सेवा उपलब्ध आहे. त्या रूग्णांना काही समस्या असल्यास त्यांनी 8308816666 आणि 8308826666 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. कोरोना रुग्ण बरे झाल्यानंतर किंवा गृह विलगीकरणात गेल्यानंतर या रूग्णांमध्ये नकारात्मक विचार येतात. त्यांचे विचार सकारात्मक करण्यासाठी समुपदेशन करण्यात येत आहे. समुपदेशनासाठी भ्रमणध्वनी क्रमांक 9823254520, 9765090777, 9326811266, 8788297527 आणि 9823238057 यावर रूग्णांनी संपर्क साधावा. रुग्णांच्या सुविधेसाठी सर्व रुग्णांना त्यांनी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल एसएमएसद्वारे कळविण्यात येतो.