लॉकडाउनच्या भितीने बँक ऑफ इंडिया समोर जमली मोठी गर्दी

देवरी ५:
मागील काही दिवसांत करोनानं अक्षरक्षः थैमान घातल्यानं राज्य सरकारची झोप उडाली आहे. प्रचंड वेगानं होत असलेल्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य सेवेवर ताण येण्यास सुरूवात झाली असून, रुग्णांचे हाल टाळण्यासाठी आणि विषाणू संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारकडून लॉकडाउन संदर्भात चाचपणी सुरू होती. सर्वच क्षेत्रातील प्रतिनिधी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत लॉकडाउन/ कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

याचे पडसाद ग्रामीण भागात दिसुन येत असुन मागील वर्षी ज्या समस्या ग्रामीण जनतेला भोगाव्या लागल्या त्याची पुनरावृत्ति होऊ नये या भितीमुळे आज बँक सुरू होताच देवरी येथील बँक ऑफ इंडिया समोर ग्रामीण नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.

आमच्या प्रतिनिधिनी बैंक समोरील ग्रामीण भागातील लोकांशी सवांद साधला असता कोरोना पेक्षा आर्थिक संकट मोठे आहे आणि मागिल वर्षीपासुन आम्ही शेतकरी , मोलमजूर काय यातना सहन करत आहोत हे आम्हालाच माहिती आहे असे मत व्यक्त केले.

Share