कोविड १९ विषाणु प्रतिबंधाकरिता उपाययोजनेसाठी चर्चा सत्र संपन्न

देवरी ५: कोविड 19 चे वाढते प्रभाव पाहता तहसील कार्यालय देवरी येथे कोविड प्रतिबंध करिता उपाययोजना निमित्ताने चर्चा सत्राचे आयोजित केले होते. या सत्राचे आयोजन विजय बोरुडे तहसीलदार देवरी यांनी केले असुन आमगावदेवरी विधान सभेचे आमदार सहसराम कोरोटे अध्यक्ष स्थानी होते. यावेळी आमदार सहसराम कोरोटे यांनी मार्गदर्शन केले.

सदर चर्चा सत्रात सिरसाट साहेब उपविभागीय अधिकारी देवरी, विजय बोरुडे तहसीलदार देवरी, अजय पाटणकर मुख्याधिकारी नागरपंचाय देवरी, रेवचंद सिंगनजुडे ठाणेदार देवरी, संदीप भाटिया अध्यक्ष तालुका काँग्रेस कमेटी देवरी, बळीरामजी कोटवर काँग्रेस नेते व सर्व देवरी तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें