सार्वजनिक ठिकाणी उघडपणे दारू पिणारे व पिण्याची व्यवस्था करणारे सहा लोकांवर देवरी पोलिसांची कारवाई

डॉ. सुजित टेटे । प्रहार टाईम्स

देवरी २: येथे अंडा भूँजीच्या टपरीवर सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्याचे प्रमाण वाढल्याने त्यांच्या त्रास परिसरातील सामान्य जनतेला होऊ लागला त्याबाबत सर्वसामान्य जनतेतून तक्रारी प्राप्त झाल्या दारू पिण्याची व्यवस्था करून देणारे अंडा दुकान हातठेले व टपरी चालक व दारू पिणारे व्यक्ती विरोधात कारवाई करण्यात आली दि: १/४/२०२१ रोजी रेवचंद सिंगनजुड़े ठाणेदार पोलीस स्टेशन देवरी पेट्रोलिंग दरम्यान देवरी येथील सम्राट बारचे आजूबाजूला सार्वजनिक ठिकाणी अंडा भूँजीचे ठेल्यावर काही इसम दारू पीत असल्याची माहिती मिळाल्याने त्या ठिकाणी पोलीस पथकासह तपासणी केली असता काही लोक सर्रासपणे दारू पिताना दिसुन आल्याने त्यांना दारू पिण्याचा पास परवाना बाबत विचारले असता त्यांच्याकडे कुठलाही परवाना दिसून न आल्याने आरोपी अंकुश दयाराम उके वय 49 वर्ष राहणार धोबीसराड, सुनील प्रेमलाल उके वय 40 वर्षे, प्रकाश डोंगरे वय 49 वर्षे राहणार गोटाबोडी (टपरी मालक) यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन देवरी येथे अपराध क्रमांक ८२/२०२१ कलम 68,84,86 महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


तसेच बिहारी बुधराम सातार वय 35 वर्षे राहणार देवरी, परमानंद बडोले राहणार देवरी, भोजराज लक्ष्मण कांबळे राहणार भागी (टपरी मालक) यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन येथे अपराध क्र 83/2021 कलम 68 ,84 ,86 अंतर्गत महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कारवाई विश्व पानसरे पोलीस अधिक्षक गोंदिया , अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधिक्षक गोंदिया , जालंधर नाल्कोल उपविभागीय पोलिस अधिकारी आमगाव अतिरिक्त कार्य देवरी यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक रेवचंद सिंगनजुड़े , पोलीस उपनिरीक्षक उरकुडे, पोलीस हवालदार तिरपुडे ,पोना करंजेकर , पोना मस्के पोलीस शिपाई कांदे, पोलीस शिपाई भांडारकर ,पोलीस शिपाई हजारे यांनी केली आहे.

Share