आ. सहेषराम कोरेटेंच्या हस्ते ककोडी-धोबाटोला रस्त्याचे भूमिपूजन

प्रहार टाईम्स

देवरी १९: तालुक्यातील ककोडी येथे आमदार सहेषराम कोरोटे यांच्या हस्ते ककोडी धोबाटोला रस्ता बांधकामाचे मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत भूमिपूजन गुरुवारला(दि.१८) करण्यात आले.

यावेळी ककोडी ग्राम पंचायत सरपंच मिना दिलीप मडावी ,उपसरपंच आणि सर्व ग्राम पंचायत सदस्य उपस्थित होते.

भूमीपूजन कार्यक्रमाला समाजसेवक अमरदास सोनबोईर,बबलु भाटिया, ऊचेपुर ग्रामपंचायत सरपंच गहाणेबाई, ऊचेपूचरचे ग्रामपंचायत सदस्य, ककोडीचे पोलिस पाटील चंद्रपाल शहारे,ग्रामपंचायत सदस्य विनोद सुरसावंत,नरेंद्र सान्डील,सोहन साहु आणि गावातील नागरिक उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share