आदिवासी बहुल दुर्गम क्षेत्राच्या विकास कामाला गती देऊ – खा. प्रफुल पटेल

धनेगांव ( दरेकसा ) येथे पक्ष कार्यकर्ते व नागरिकांशी संवाद

तालुका प्रतिनिधी सालेकसा:
जिल्हातील सालेकसा, देवरी , अर्जुनी / मोर आदिवासी बहुल तालुके असुन त्यात सालेकसा तालुक्यातील धानेगाव दरेकसा, यासह अनेक क्षेत्र दुर्गम भागात मोडतात. या क्षे़त्राच्या प्रतिनिधीत्वासाठी रिंगनात होतो तेव्हा आपण भरभरुन प्रेम दिले होते. तेव्हाच या क्षेत्राचा विकासाचा पायेंडा रचण्यात आला. 90 च्या दशकात खा. शरद पवार यांनी आपल्या माध्यामातुन या क्षेत्राला भेट दिली होती तेव्हा अनेक विकास कामे सुरु करण्यात आली मध्यंतरी च्या काळात विकास कामे रखडली हे मान्य आहे. मात्र आगामी काळात दुर्गम क्षेत्राच्या विकास कामांना निश्चित गती देवु अशी ग्वाही खा. प्रफुल पटेल यांनी दिली . धनेगांव येथे तालुका राष्ट्रवादी काॅग्रेस तर्फे जनसंवाद व पक्ष कार्यकत्याची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी संवाद साधतांना ते बोलत होते.
खा. प्रफुल पटेल पुढे म्हणाले 90 च्या दशकात स्थानीक नागरिक व युवकांना रोजगार उपलब्ध व्हावे यासाठी तत्कालीन आपल्या पक्षाच्या सरकार ने विशेष कृती कार्यक्रम राबविले होते या माध्यमातुन शिक्षण, पोलीस, आरोग्य यासारख्या विविध विभागात चर्तुथ श्रेणी कर्मचारी म्हणुन जिल्ह्यातील युवकांना प्राधाण्याने देवुन नोकरीत सामावून घेण्यात आले. आदिवासी क्षे़त्राच्या सर्वागिण विकास व्हावा म्हणुन त्याकाळात राज्य सरकारच्या एकुण उत्पनाच्या 9 टक्के निधी राज्य सरकारच्या अर्थ कारणात सुरक्षित करण्यात आले ते आजही कायम आहे . बेवारटोला प्रकल्पाचे कामे प्रगती पथावर यावे या अनुसंगाने सिंचन मंत्री जयंत पाटील यांनी तालुक्याच्या कामा निमित्त आढावा घेतला या प्रकल्पाच्या कामाला गती देण्या करिता निश्चित निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे याशिवाय आदिवासी बहुल अति दुर्गम क्षे़त्राच्या विकास कामाला गती देवु असे ही आश्वासन खा. प्रफुल पटेल यांनी दिले.

धनेगाव येथील कार्यक्रमात खा. पटेल यांच्या सोबत सर्वश्री माजी आमदार राजेंद्र जैन, माजी खा. खुशाल बोपचे, नरेश माहेश्वरी, विजय शिवणकर, सौ. दुर्गा तिराले, गोपाल तिराले, प्रभाकर दोनोडे, कैलास धामडे, बिसराम चर्जे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Share