देवरी येथे खा. प्रफुल पटेल यांची आढावा बैठक संपन्न

प्रहार टाईम्स

देवरी १२: येथे आयोजित राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत तालुक्यातील समस्यांचा खा. प्रफुल पटेल यांनी आढावा घेतला. यावेळी देवरी तालुक्यातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार केला. तसेच उपस्थित नागरिकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी तालुक्यातील अधिकार्‍यांशी भ्रमणध्वनी वर चर्चा करुन त्वरील समस्या सोडविण्याची सूचना सुद्धा केली.

देवरी येथील कार्यक्रमात आमदार मनोेहर चंद्रिकापुरे, माजी आमदार राजेंद्रजी जैन, नरेश माहेश्वरी, विजय शिवनकर,रमेश ताराम, गंगांधर परशुरामकर , सी.के बिसेन, गोपाल तिवारी, भैयालाल चांदेवार, केशोराव भुते, इंदर अरकरा, सौ. पारबता चांदेवार, किशोर तरोणे, दिलीप दुरुगकर, हिमांशु ताराम, सुजीत अग्रवाल, सौ. शर्मीला टेंभुरकर,सौ. सुमनताई बिसेन, सौ. अर्चनाताई ताराम, नेमीचंद आंबिलकर, योगेश देशमुख, सौ. मंजुशाताई वासनिक, सत्यवान देशमुख, सौ. माधुरी सहारे, फगून कल्लो, मुन्नाजी अन्सारी, लंबलजी खान, मोंटीजी अन्सारी, रंजन मेश्राम, पंकज सहारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share