‘मोहफुल’ आणि ‘लाख’ व्यवसायातून ती पोहचली साता समुद्रापालीकडे

चांदलमेटा to देवरी, कंबोडिया,थायलंड आणि रोम रिटर्न पहिली आदिवासी महिला ठरली ‘हिरकणी’

डॉ. सुजीत टेटे /संपाद

यशोगाथा सन्मान महिलांचा त्यांच्या कर्तुत्वाचा

अतिशय डोंगराळ, नक्षल , आदिवासी बहुल भाग म्हणून देवरी तालुक्याची ओळख आहे. महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमेवर वसलेल्या या छोट्या तालुक्यातील अतीदुर्गम ग्राम पंचायत ओवारा अंतर्गत येत असलेल्या चांदलमेटा गावातील वंदना उईके यांचा प्रहार टाईम्स चे संपादक डॉ. सुजीत टेटे यांनी नुकतीच महिला दिनाचे औचित्य साधून मुलाखत घेतली.

चांदलमेटा 300-400 आदिवासी समजाच्या लोकांची वस्ती असून या गावात अजूनही शासनाच्या संपूर्ण योजना पोहचलेल्या नाहीत. या गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून मोलमजुरी , पशुपालन , कुक्कुटपालन आणि सरपण जमा करण्याचे आहे . एकंदरीत हे गाव आर्थिकदृष्ट्या कमकुवत म्हणाला हरकात नाही.

वंदना उईके यांना 3 मुली आणि 1 मुलगा असून कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. कुठलेली उपजीविकेचे साधन नसतांना आपल्या मुलींचे शिक्षण आणी जीवन जगण्यासाठी आजच्या महिलाना प्रेरणा देणारी महिला म्हणजे वंदना बाई.

चांदलमेटा गाव डोंगराच्या पायथ्याशी वसलेले असून सदर गाव परिसर वनसंपत्तीने बहरलेले आहे. आपली उपजीविका भागविण्यासाठी गावातील लोक बाहर शहरात काम शोधयला भटकत असतात त्यातच गावातील वंदना उईके यांनी गावातील महिलांना एकत्रित करून शेतातील आणि गावा लगतच्या मोहफुल आणि लाख या वनसंपत्तीचे स्वत संकलन करून उपजीविकेला आधार देण्याचे कार्य केले.

वंदना उईके यांच्या कार्याची दखल घेत महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत नारी चेतना लोकसंचलित साधन केंद्र देवरी या संस्थेने घेऊन चांदलमेटा गावाला भेट दिली. वंदना उईके यांचे कडून त्या चालवीत असलेल्या लाख उत्पादन आणि मोहफुल पासून औषधी निर्मितीची माहिती जाणून घेतली.

अतीदुर्गम भागातील आदिवासी महिलेने महिलांच्या उपजीविकेला लाख उत्पादनातून हातभार लावून आपली जगत वेगळी ओळख निर्माण केलेली आहे . वंदना उईके यांच्या सोबत गावातील 30 महिला लाख उत्पादन आणि मोहफुला पासून औषधी निर्मितिचे काम करीत आहेत.

त्यांच्या कामातील कौशल्य बघून त्यांना जगाच्या पाठीवर असलेल्या थायलंड देशात लाख उत्पादन आणि लाख उत्पादन कौशल्याचे प्रशिक्षण देण्या करिता आमंत्रित करण्यात आले होते. त्यांचे ग्रामीण भागातील कौशल्य त्यांना साता समुद्रापालीकडे घेऊन जाणार हे त्यांनी कधीच स्वप्नात ही बघितले नव्हते असे त्यांनी मुलाखतीत सांगितले.

थायलंड वरुण आल्यावर त्यांच्या आत्मविश्वास वाढला आणि आझून जोमाने आपल्या गावातील महिलासोबत त्या लाख उत्पादनसोबत लाखे पासून तयार होणार्‍या उत्पादनकडे लक्ष केन्द्रित केले. लाखेपासून त्या नेलपेंट , पेपर वेट , दिवे आणि विविध वस्तु तयार करीत असल्याचे संगितले. त्यांच्या कार्याची दखल घेत पुन्हा त्यांना कंबोडिया देशात प्रशिक्षण देण्या करिता आणि कंबोडिया तिल कौशल्या आत्मसात करण्याची संधि प्राप्त झाली. अतिशय उत्साही आणि होतकरू वंदना बाई कंबोडिया देशात गेल्या आणि देवरी तालुक्यातील चांदलमेटा गावातील कौशल्य दुसर्‍या देशातील लोकांना शिकविले. एका आदिवासी समाजात जन्मलेल्या महिलेला आपल्या डोंगराळ गावातील लाख उत्पादन आणि मोहफुल औषधी निर्मितीची माहिती चक्क दुसर्‍या देशात देण्याची जी संधि मिळाली ती त्यांना एखाद्या नोबेल पुरस्करसारखी निश्चितच वाटली असेल.

चांदलमेटाचे वंदना बाई कंबोडिया वरुन प्रशिक्षण झाल्यावर पुन्हा रोम देशात आपल्या कौशल्याची माहिती आणि प्रशिक्षण देण्या करिता आमंत्रित करण्यात आल्याचे सांगतात त्या मध्ये त्यांना लाख उत्पादनाचे उत्कृष्ठ असे प्रदर्शन बघयला मिळाले आणि चांदलमेटा येथील कौशल्य वाटायला संधी मिळाली.

वंदना बाई नि चक्क तीन देशात चांदलमेटा गावातील लाख उत्पादनाची प्रक्रिया आणी आपले परिश्रम जगासमोर मांडले असून आपली एक वेगळी ओळख निर्माण केळ्याचे बघावयास मिळते.

देवरी सारख्या मागासलेल्या तालुक्यातून जगाचे प्रतिनिधित्व करण्याचा मान वंदना बाई उईके यांना मिळाला . आज जागतिक महिला दिन या निमित्त सन्मान महिलांचा त्यांच्या कर्तुत्वाचा या विशेष मुलाखतीत प्रहार टाईम्स कडून त्यांना मानाचा मुजरा …..

Share