हायवे दरोड्यातील आरोपीना अटक १४,३५,६६३/- मुद्देमाल जप्त…
देवरी ८:
दिनांक २८/०२/२०२१ रोजी फिर्यादी नामे प्रविन रामभाऊ धांडे रा. जैननगर मानकापुर, नागपुर हा ट्रक क्रमांक सि.जी. ०७ सि.ए. ३४०० मध्ये लिंगराज कंपनी रायपुर छत्तीसगड येथुन २५ टन ४० कि.ग्रा. लोखंडी सरीया १२,४५,६३३ /- रु. किमतीचा माल भरुन नागपुर येथे जात असतांना मौजा देवरी हायवे रोडवर एक पांढऱ्या रंगाची बिना नंबरची झायलो सारखी दिसणाऱ्या चारचाकी वाहनामध्ये आठ लोक येवुन ट्रक अडवुन, ट्रकचे कॅबिनमध्ये घुसुन ट्रक चालक फिर्यादीस हाताबुक्यानी मारुन कॅबीनमध्ये असलेल्या नायलॉन दोरीने त्याचे हातपाय बांधुन व डोळयाला टॉवेल बांधुन ट्रकचे ड्रायव्हर सिटचे मागील सिटवर झोपवीले व स्वतः ट्रक चालवीत नेवुन ट्रकमधील लोखंडी सरीया १२,४५,६३३ /- रु. किमतीचा माल कुठेतरी गहाळ करुन ट्रक व फिर्यादीस पो.स्टे. नागभीड येथील नागभीड ते नागपुर रोड मौजा नवखडा गावाजवळ फिर्यादीस व ट्रकला सोडुन दिल्याने फिर्यादीचे तक्रारीवरुन पो.स्टे. नागभीड जिल्हा चंद्रपुर येथे ००/२०२१ कलम ३४१, ३९५ भा.द.बी चा गुन्हा नोंद करुन सदर गुन्हयाची घटना पो.स्टे. देवरी येथील असल्याने पो.स्टे. देवरी येथे अप. क्र. ४०/२०२१ कलम ३४१, ३९५ भा.द.वी चा अज्ञात आरोपीतांनविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्ह्यातील आरोपीतांचा शोध घेणेकामी पोलीस अधिक्षक गोंदिया यांनी दिलेल्या उपयुक्त मार्गदर्शक सुचना प्रमाणे सदर गंभीर गुन्ह्याचा तपास कामी पोलीस स्टेशन देवरी व स्था.गु.शा. गोंदिया येथील पोलीस तपास पथक तयार करण्यात आले.
तपास पथकांनी फिर्यादीने सांगीतल्याप्रमाणे गुन्हा घडल्यापासुन भंडारा, नागपुर, नागभीड येथे जाऊन गोपनिय माहीती काढली असता नागपुर येथील इसम नामे पप्पु हसन रा. डोंगरगांव, पो. स्टे. हिंगना जिल्हा नागपुर व त्याचे साथीदार अशा प्रकारचे गुन्हे करतात अशी माहीती मिळाली. प्राप्त माहीतीच्या आधारे पप्पु हसन रा. डोंगरगाव याला पोलीस पथकाने ताब्यात घेवुन सदर गुन्हयाच्या अनुषंगाने विचारपुस केली असता सदरचा गुन्हा त्यानी व त्याचे ७ साथीदार यांनी केल्याची कबुली दिल्याने आरोपी नामे १) शफीर नजिर हसन उर्फ पप्पु हसन वय ५५ वर्ष रा. डोंगरगांव ता. हिंगना, जि. नागपुर २) शुभम वासुदेव चक्रवर्ती वय ३१ वर्ष रा. नविन गुमगांव, ता. हिंगना, जि. नागपुर ३) ऋषभ ज्ञानेश्वर चिरुटकर वय १९ वर्ष रा. नविन गुमगांव/वाघधरा ता. हिंगना, जि. नागपुर ४) अरुन देवाजी वरखडे वय २२ वर्ष रा. नविन गुमगांव/वाघधरा ता. हिंगना, जि. नागपुर ५) महेंद्र नेवालाल गमधरे वय ३५ वर्ष, रा. डोंगरगांव ता. हिंगना जि. नागपुर ६) अभिलेख नामदेव गावतुरे वय १९ वर्ष रा. नविन गुमगांव वाघधरा ता. हिंगना, जि. नागपुर ७) अशोक लक्ष्मण दुधनाग वय १९ वर्ष रा. नविन गुमगांव/वाघधरा ता. हिंगना, जि. नागपुर या सर्वाना ताब्यात घेवुन पो.स्टे. देवरी येथे आणुन कायदेशीररित्या अटक करण्यात आले.
सर्व आरोपीतांना मा. न्यायालयात हजर करुन दिनांक ०८/०३/२०२१ पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आले आहे. सदर गुन्ह्यातील ट्रक क्रमांक सि.जी. ०७ सि.ए. ३४०० मधील लोखडी सरीया याबाबत विचारपुस करुन अटक केलेल्या एका आरोपीने सदर माल काढुन देत आहे. अशी माहीती दिल्याने आरोपीने सांगीतल्याप्रमाणे नागपुर येथे जाऊन मौजा सोंडपार जिल्हा नागपुर येथील हायवेपासुन दुर कच्च्या रोडावर गुन्ह्यातील संपुर्ण माल व गुन्ह्यात वापरलेली चारचाकी वाहन ताब्यात घेऊन एकुण १४,३५,६६३ /- रु. चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन सदर गुन्ह्याचा तपास सपोनि, अजीत कदम, पो.स्टे.देवरी हे करीत आहेत.
सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक विश्व पानसरे, मा. अपर पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी जालंधर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि, आव्हाड व पथक स्था.गु.शा. गोदिया, सपोनि. अजीत कदम, पोउपनि, उरकुडे, पोउपनि. पाटील पो.स्टे. देवरी , पोउपनि. इस्कापे पो.स्टे.चिचगड, पोहवा. तिरपुडे, पोना शेंडे, चापोहवा. कनपुरीया यांनी केली