शेतकऱ्यांचे आणि विज ग्राहकांचे विद्युत कनेक्शन खंडित करू नका : करुणा कुर्वे

उपकार्यकारी अभियंता देवरी यांना दिले निवेदन

देवरी ४: कोरोनामुळे शेतकरी आणि सामान्य माणूस हवालदिल झालेला आहे. त्यावर वीज ग्राहकांना व शेतकर्यांना वीज बिलाचा मोठा ताण सहन करावा लागत असून वीजबिल थकबाकी विषयी कोणताही निर्णय येत पर्यंत वीज ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात येऊ नये असे निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2 मार्चला विधांमंडळात घेतला असून कोणत्याही शेतकऱ्याचा आणि ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित करू नका आणि खंडित केलेला पुरवठा सुरू करण्यात यावा व थकीत वीज बिल 3-4 हप्त्यात भरण्याची मुभा देण्यात यावी अशी मागणी महिला जिल्हा संघटिका करुणा कुर्वे यांनी केलेली आहे.

यावेळी प्रीती उईके, सरोज शुक्ला, कविता गुप्ता, दीपमाला चंदेल, छाया टेम्भुरकर, मनीषा पुराम, शकुंतला मोरदेवें, निर्मला ताराम , निरु पठाण , टिनू केवट उपस्थित होते.

Share