नक्षल्यांनी पेरून ठेवलेले स्फोटक साहित्य सोयगावटोलीच्या जंगलातून जप्त
गोंदिया ०३- प्राप्त माहिती नूसार जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भाग असलेल्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या सोयगावटोली जंगल परिसरात घातपात घडवून आणून पोलिसांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने नक्षल्यांनी स्फोटक साहित्य पेरून ठेवले होते. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी पेरून ठेवलेले स्फोटक साहित्य जप्त केले आहे. घातपात करण्याच्या उद्देशाने नक्षलवाद्यांनी ही स्फोटके या परिसरात लपवून ठेवली होती.
सोयगावटोली जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी स्फोटकांचा साठा लपवून ठेवल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या नेतृत्वात सी 60 कमांडो पथक, बीडीडीएस पथक व केशोरी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांच्या पथकाने आज ३ मार्चला शोधमोहीम सुरू केली. ही मोहीम सुरू असताना सोयगावटोली जंगलात शोधमोहिमेदरम्यान काही असल्याचे आढळून आले. ते बाँम्बशोधक पथकाच्या साहित्याने बाहेर काढण्यात आले.
घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने स्फोटक साहित्य लपवून ठेवले–
या शोधमोहिमेमध्ये पोलिसांना सोयगावटोली जंगलात एक १० किलोग्राम वजनाचा डबा, त्यामध्ये ३ जिलेटीनच्या कांड्या आणि ९ जिवंत डिटोनेटर, रसायन मिश्रीत रेती असे स्फोटक साहित्य नक्षलवाद्यांनी घातपात घडवून आणण्यासाठी लपवून ठेवल्याचे आढळून आले. पोलिसांनी हा स्फोटकांचा साठा ताब्यात घेतला असून या प्रकरणी २५/२०२१ कलम ४, ५ भारतीय स्फोटक पदार्थ कायद्यान्वये अज्ञात नक्षलवाद्यांविरोधात केसोरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात किशोरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.