कोविड -19 लसीकरण मोहिम व आत्मनिर्भर भारत जनजागृती मोहिमेचा लाभ घ्यावा – अपर जिल्‍हाधिकारी खवले

बहुमाध्यमी जनजागृती मोबाईल व्हॅनचे शुभारंभ

माहिती आणि प्रसारण मंत्रालयातील प्रादेशिक लोकसंपर्क
ब्युरो, पुणेच्या अधिनस्त क्षेत्रिय लोक संपर्क ब्युरो, नागपूरचा उपक्रम

डॉ. सुजित टेटे

गोंदिया, दि. 25: कोविड 19 लसिकरण आणि आत्मनिर्भर भारत या विषयावर गोंदिया जिल्ह्यातील सर्व तालुक्यात जनजागृती करण्यासाठी तयार केलेल्या बहुमाध्यमी मोबाईल व्हॅनवरील फिरत्या प्रदर्शनाचे तसेच कलापथक मोहिमेचा शुभारंभ अपर जिल्‍हाधिकारी राजेश खवले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे, क्षेत्रीयलोक संपर्क ब्युरो, कोल्हापूर विभागाचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत, जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. अमरीश मोहबे, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ.नितीन कापसे, निवासी वैद्यकिय अधिकारी सुवर्णा हुबेकर, नायब तहसिलदार प्रविण जमदाडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, तकनीकी सहायक संजय तिवारी, जिल्हा माहिती व शिक्षण प्रसिध्दी अधिकारी प्रशांत खरात, जिल्हा समन्वयक (वनहक्क) के.बी. मिश्रा प्रामुख्याने उपस्थित होते.


बहुमाध्यमी मोबाईल व्हॅनवरील कोविड 19 लसिकरण आणि आत्मनिर्भर भारत या विषयावर संपुर्ण जिल्ह्यात फिरत्या प्रदर्शनाचे कलापथकाद्वारे जनजागृती करण्यात येईल, नागरिकांनी सदर जनजागृतीचा लाभ घ्यावा. तसेच कोविड-19 ची लस पुर्णपणे सुरक्षित असून सर्व सामान्यांनी लस टोचून घ्यावे, व लसीकरणाबाबत कोणत्याही अफवांनवर विश्वास ठेवू नये असे आवाहन अपर जिल्हाधिकारी खवले यांनी या वेळेस केले. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने वेळोवेळी निर्गमीत केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. सर्व सामान्यांनी मुखपट्टी (मास्क) व सामाजिक अंतराचे पालन करुन सार्वजनिक ठिकाणी विनाकारण गर्दी करु नये, वारंवार हाथ धुवावे असे संबोधन त्यांनी या वेळेस उपस्थितांना केले.
माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या प्रादेशिक लोक संपर्क ब्युरो, पुणे यांच्यावतीने हे उपक्रम राबविण्यात येत आहे. यात जागतिक आरोग्य संघटना युनिसेफ आणि आरोग्य विभाग, महाराष्ट्र यांचे सहकार्य लाभले आहे. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील ३६ जिल्हयात १६ व्हॅन्सद्वारे फिरते बहुमाध्यमी प्रदर्शन आयोजित करून तसेच कलापथकांच्या माध्यमातून लोकांमध्ये कोविड-19 लसिकरण मोहिम आणि आत्मनिर्भर भारत अभियानाबद्दल जनजागृती निर्माण करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून क्षेत्रीय लोक संपर्क ब्युरो, नागपूरच्यावतीने गोंदिया जिल्ह्यातील विविध तालुक्यातील गावांमध्ये १० दिवस व्हॅनद्वारे फिरते बहुमाध्यमी प्रदर्शनाच्या माध्यमातून ही मोहिम राबविण्यात येत आहे.


या उपक्रमांतर्गत लसिकरणाबाबतची माहिती, आत्मनिर्भर भारत अंतर्गत विविध उपक्रम आणि कोविड-19 विषयक नियमांबाबतची माहिती जिल्ह्यातील नागरीकांपर्यंत पोहचविणे हा यामागील उद्देश आहे. लसिकरणाविषयी असलेले गैरसमज आणि अफवांबाबत जनतेला जागृत करणे, आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी सरकार करीतअसलेल्या प्रयत्नांची माहिती फिरत्या बहुमाध्यमी प्रदर्शनाच्या माध्यमातून लोकांनाकरून देण्यात येणार आहे.


यावेळी कलापथकातील कलाकारांच्या माध्यमातून कार्यक्रमाचे सादरीकरण करून लोकांपर्यंत जनजागृती संदेश पोहचविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जनजागृती मोहिमेसाठी जिल्हाधिकारी कार्यालय,जिल्हा आरोग्य विभाग आणि जिल्‍हा माहिती कार्यालय यांचे सहकार्य लाभले आहे.
या मोहिमेच्या यशस्वितेसाठी प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो, पुणेचे संचालक प्रकाश मकदुंम यांच्या मार्गदर्शनात सहायक संचालक निखील देशमुख, मीना जेटली, क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो, कोल्हापूरचे क्षेत्रीय प्रचारअधिकारी हंसराज राऊत व्यवस्थापक डॉ. जितेन्द्र पानपाटील, तकनीकी सहायक संजय तिवारी, श्रीमती संजीवनी निमखेडकर, जी नरेश आणि कलापथकाचे श्रीकृष्‍ण बहुउद्देशिय विकास मंडळ, यवतमाळ व त्यांच्या चमूचे सदस्य परिश्रमघेत आहेत.


Share