देवरी तालुका ग्रीन झोन मधे असुन तो कायम ठेवण्यास नागरीकांनी सहकार्य करावे- डॉ. ललित कुकडे (TMO)

डॉ. सुजित टेटे

देवरी २२:
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच राज्यातिल जनतेशी संवाद साधला आणि कोरोनाला हरविण्यासाठी सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे नाही तर लॉकडाउन करु असे अल्टीमेटम दिले.

याबद्दल देवरी तालुक्यातिल कोविड ची स्थिती जाणून घेण्यासाठी प्रहार टाईम्स ने तालुक़ा वैद्यकिय अधिकारी डॉ. ललित कुकडे यांच्याशी संपर्क साधला असता सध्या देवरी तालुका ग्रीन झोन मधे असुन तो क़ायम ठेवण्या करिता जनतेनी सहकार्य करावे अशी त्यांनी अपेक्षा केली.

देवरी ग्रीन झोन मधे असला तरी सर्वानी मास्क , सोशल डिस्टंस, सेनीटायझर चा वापर करुण ख़बरदारी घ्यावी जेणे करुण आपल्याला व आपल्या कटुंबाला सुरक्षित ठेवता आले पाहिजे.

सध्या देवरी मधे कोविड चाचणी केंद्र बंद असुन जिल्हात गोंदिया आणि सड़क अर्जुनी या ठिकाणी सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. गरज पडल्यास देवरी येथे पुन्हा कोविड चाचणी सुरु केली जाईल, PWD चे विश्रामगृह अलगीकरणासाठी सज्ज असल्याचे सांगण्यात आले.

Share