विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार आणि जिल्हाधिकारी दीपककुमार मीणा सहपरिवार मांडोदेवीच्या दर्शनाला

डॉ. सुजित टेटे

देवस्थानातर्फे अधिकाऱ्यांचे स्वागत आणि चर्चा

देवरी २२: जिल्हातिल प्रसिद्ध निसर्गरम्य ठिकाणी, हिरव्यागार जंगलात असलेले धार्मिक श्रद्धास्थान मांडोदेवी देवस्थान ला विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार आणि गोंदिया जिल्हाधिकारी दीपककुमार मीणा यांनी सहपरिवार भेट देऊन दर्शन केले.

मांडोदेवी देवस्थान तर्फे सर्वांचे स्वागत करण्यात आले. मांडोदेवी मंदिरात आशीर्वाद घेतला यावेळी मुख्य पुजारी अयोध्यादास महाराज यांनी आरती आणि पूजा अर्चना करण्याच अधिकाऱ्यानां मान दिला.

अधिकाऱ्यांनी मंदिर परिसराचे भ्रमण करुण निसर्गाच्या सानिध्यात सहपरिवार आस्वाद घेतला. मंदिराच्या विकासासाठी कायकाय करता येणार अशी चर्चा करण्यात आली असल्याचे सांगण्यात येते.

यावेळी मांडोदेवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष भैयालाल सिंदराम, दम्मुजी अग्रवाल, व्यवस्थापक डॉ. लक्ष्मण भगत, सहसचिव कुशन घासले, सकाराम सिंद्राम, शालिकराम उईके उपस्थित होते.

Share