लायनेस क्लब देवरीद्वारे मुलींना शैक्षणिक साहित्य वाटप
प्रहार टाईम्स
देवरी 16 :तालुक्यातील के एस जैन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे लायनेस क्लब देवरी द्वारे मुलींचा शैक्षणिक उत्साह वाढावा या उद्देशाने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले असून सदर कार्यक्रमाचे आयोजन क्लबचे कैबिनेट ऑफिसर उर्मिला परिहार यांनी केले असून कार्यक्रमाच्या मार्गदर्शका म्हणून प्राचार्या रजिया बैग उपस्थित होत्या.
ऑनलाइन शिक्षण आणी मोबाइल फोन च होणारा गैरवापर या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केला असून मुलींनी आजच्या जगत जागरूक राहून आपल्या ध्येया कडे विशेष लक्ष द्यावा आणि देशाचा नाव लौकिक करावा असे त्या यावेळी बोलत होते.
कॅबिनेट आफिसर ऊर्मिला परिहार यांनी शिक्षण आणी समाज व मुलींची भूमिका यावर विशेष मार्गदर्शन केला. या कार्यक्रमात डिस्ट्रिक्ट क्लब च्या सेक्रेटरी शीला मारगाये, देवरी क्लब च्या अध्यक्षा संगीता पाटील ,क्लब च्या सेक्रेटरी शिल्पा बांते, वैशाली ताई संगिडवार,शुभांगी निनावे , शुभांगी गोडशेलवार , माजी अध्यक्षा सुलभा भुते , वनितादहिकर प्राध्यापक सुनंदा भूरे, ममता रोकड़े, सरोज गहरवार , प्राध्यापक बिसेन , निर्मला राखड़े, मंगला मेश्राम उपस्थित होत्या.
कार्यक्रमा मध्ये 4 मुलींना फिजिक्स च्या पुस्तकं वितरित केल्या असून 77 मुलींना रजिस्टर वितरित करण्यात आले. कार्यक्रमचे संचालन ऊर्मिला परिहार तर आभार प्रदर्शन अल्का दुबे यांनी मानला .