लघुचित्रपट निर्माता /निर्देशक किशोर देशकर यांचा सपत्नीक मराठी टॅलेंट चित्रपट संघटना पुणे शाखा गोंदिया यांच्या वतीने सत्कार.
सुदर्शन लांडेकर
प्रहारTimes
गोंदिया : बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन गोंदिया इथे एक अस्वरणीय आगळा वेगळा कार्यक्रम मराठी टॅलेंट चित्रपट संघटना पुणे शाखा गोंदिया आणि हिराज प्रॉडकशन गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमानाने ” कलावंत सत्कार सोहळा ” ‘पाखर माझ्या मातीची’अशा कार्यक्रम सोहळा पार पडला,
गोंदिया जिल्ह्यात पहिल्यांद्याच झालेल्या अश्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात निर्माता, निर्देशक, कलाकार, गायक, कथाकार, गीतकार, नायक, नायिका, डान्सर, एडिटर, सिनेमाटोग्राफर, लघुपट, अलबम सॉंग्स, वेब सिरिज अश्या प्रत्येक क्षेत्रातील कलावंताचा सन्मान करण्यात आला,
किशोर देशकर ह्यांनी आदिवासी भागात राहून आतापर्यंत “ओझा, व्यसनाच विळखा, आणि माझी शाळा केव्हा”अशा तीन लघुपटाची निर्मिती केली आहे. “क्या आपको पत्ता हैं” या शॉर्ट व्हिडिओ च्या माध्यमातून त्यांनी कोरोना काळात जनमानसात जनजागृती केली आहे. किशोर देशकर यांचे तीन कविता संग्रह प्रकाशित असून त्यांनी धरती बचाव मोहिमेतून पक्षी आणि प्राण्यासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे.
त्यांच्या “ओझा ” ह्या चित्रपटासाठी हिराज प्रॉडकशन गोंदिया च्या वतीने आमंत्रित करून सपत्नीक गौरव करण्यात आले.कार्यक्रमात किशोर देशकर आणि त्यांच्या पत्नी कुमुद देशकर यांच्या सुद्धा यात सत्कार करण्यात आला.
ह्या कार्यक्रमात उदघाटक म्हणून मा. श्री विनोद जी अग्रवाल ( आमदार गोंदिया ), मा. श्री विनोद जयस्वाल (निर्माता अविरल फिल्मस ), मा. श्री राजेशजी कापसे ( निर्माता आर. के. फिल्म्स ), मा. श्री दिनेश जी फरकुंडे ( निर्माता हिराज प्रॉडकशन ),
मा. श्री योगेश लिपने ( संस्थापक अध्यक्ष मराठी टॅलेंट चित्रपट संघटना ), मा. श्री अतुल कुडवे ( दिग्दर्शक ए. एम. एच. मुंबई ),मा. श्री शिवा बागुल (दिग्दर्शक एस. के. प्रॉडकशन पुणे ),मा.श्री अशोकजी गुप्ता, मा. श्रीमती भावनाताई कदम, मा. घनश्याम पानतावने, मा. श्री मनमितसिंग नैय्यर, मा. श्री डॉ. वंदन नखाते ( अभिनेता ), मा. श्री चिरंजीव गद्दामवार ( अभिनेता ), होते या कार्यक्रमासाठी मा. दिनेशजी फरकुंडे (निर्माता ), मा. दिलीपजी कोशरे ( निर्देशक )
यांचा खुप मोलाचा वाटा आहे.
लघुचित्रपट निर्माता, निर्देशक किशोर देशकर यांनी आपल्या यशाचे श्रेय आपल्या परिवाराला, मित्रमंडळीला, आपल्या सहकलाकाराना आणि आयोजकाना दिलं आहे.