सिलेगाव शाळेत संत शिरोमणि सेवालाल महाराज जयंती साजरी करण्यात आली

गोरेगाव तालुका प्रतिनिधी


जि प वरिष्ठ प्राथमिक शाळा सिलेगाव येथे संत शिरोमणि सेवालाल महाराज जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. कमलेश मेश्राम मुख्याध्यापक यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख अतिथि शाळेचे वरिष्ठ शिक्षक आर वाय डहाके, टी वाय भगत, यू डी चकोले एस आर साबळे यांच्या उपस्थिती पार पाडण्यात आला.


या वेळी मुख्याध्यापक यांच्या प्रमुख उपस्थितीत कोविड 19 च्या नियमाचे पालन करून प्रतिमेच्या रूपात असलेल्या संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करुन विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे शिक्षक सुंदरसिंग साबळे यांनी कुणी सांगतो म्हणून मानू नका किंवा पुरातन परंपरा आहे म्हणून पाळत जाऊ नका, तर प्रत्येक गोष्ट चिकित्सक पणे विचार करून तुमच्या बुद्धीला पटत असेल तर स्वीकारा हे सांगणारे. परिवर्तनवादी विचारांचे पुरस्कर्ते, प्रयत्नवादी व स्वावलंबी होण्याची शिकवण देणारे, सुधारणावादी, मानवतावादी संत सेवालाल यांच्या कार्यविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी संत सेवालाल महाराजच्या जीवनावरती सखोल माहीती दिली. कार्यक्रमाचे संचालन एस आर साबळे व आभार चकोले मँडम यांनी मानले.

Print Friendly, PDF & Email
Share