नगरपंचायत देवरी च्या स्वच्छ सर्वेक्षण 2021 उपक्रमात ब्लॉसम स्कुलच्या विद्यार्थ्यांची बाजी

देवरी: १५
नगर पंचायत देवरी ULB कोड 900306 अंतर्गत मुख्याधिकारी अजय पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ सर्वेक्षण 2021 उपक्रम राबविण्यात आले असून सदर उपक्रमात विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आली असून सर्व विजेते विद्यार्थी आणि सहभागी स्पर्धकांच्या नगर पंचायत देवरी अंतर्गत अभिनंदन करण्यात आला.

या स्पर्धेमध्ये तालुक्यातील लोकप्रिय ब्लॉसम पब्लिक स्कूल चे विद्यार्थी सहभागी झालेले होते त्यामध्ये
1) जिंगल: स्पर्धेत ५ स्पर्धक सहभागी झाले होते त्यापैकी प्रथम : सुजल असाटी, द्वितीय: आरव अग्रवाल
(ब्लॉसम पब्लिक स्कूल देवरी)


2) शॉर्ट मूवी : ५ स्पर्धक सहभागी
प्रथम :हर्षदर्धन किशोर देशकर
(ब्लॉसम पब्लिक स्कूल देवरी)
द्वितीय :छत्रपती शिवाजी स्कूल

3)टाकाऊ पासून टिकाऊ: २९ स्पर्धक सहभागी त्यापैकी
प्रथम: विर पवन कटकवार (ब्लॉसम पब्लिक स्कूल देवरी)
द्वितीय : मोनाली हत्तीमारे

4) पोस्टर स्पर्धेत: खुशी बैस प्रथम व संस्कृती समरीत द्वितीय

5) वॉल पेंटिंग: चंदा वनवे प्रथम,
द्वितीय खुशी बैस

6) स्ट्रीट प्ले स्पर्धेत: हिमांशू गभने प्रथम, अनन्या जाधव द्वितीय

सर्व विजेते आणि सहभागी स्पर्धकांना लवकरच बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.
नगर पंचायत देवरी अंतर्गत माझी वसुंधरा उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले असून त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांना देण्यात आलेली आहे.

लॉकडाउन च्या काळात शाळा बंद असल्या तरी नगर पंचायत देवरी च्या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्तम सहभाग दर्शविलेला असून सहभागी सर्व शाळेच्या मुख्याध्यापक , शिक्षक आणि पालकांचे मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी अभिनंदन केले.

Print Friendly, PDF & Email
Share