‘लॉकडाउन जिंदगी’ लघुपट निर्माता /निर्देशक सुदर्शन लांडेकर यांचा मराठी चित्रपट संघटना पुणे यांच्या वतीने सत्कार

देवरी १५: बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन गोंदिया इथे एक अस्वरणीय आगळा वेगळा कार्यक्रम मराठी टॅलेंट चित्रपट संघटना पुणे शाखा गोंदिया आणि हिराज प्रॉडकशन गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमानाने ” कलावंत सत्कार सोहळा ” पाखर माझ्या मातीची अशा कार्यक्रम सोहळा पार पडला,
पहिल्यांदा गोंदिया जिल्ह्यात झालेल्या अशा कार्यक्रमात निर्माता, निर्देशक, कलाकार, गायक, कथाकार, गीतकार, नायक, नायिका, डान्सर, एडिटर, सिनेमाटोग्राफर, लघुपट, अलबम सॉंग्स, वेब सिरिज अश्या प्रत्येक क्षेत्रातील कलावंताचा सन्मान करण्यात आला.

देवरी इथून सुदर्शन लांडेकर यांना सुद्धा आमंत्रित करण्यात आले होते, सुदर्शन लांडेकर ह्यांनी आदिवासी भागात राहून आतापर्यंत दोन लघुपटाची निर्मिती केली असून तेच स्वतः त्या दोन्ही लघुपटाचे मुख्य नायक आहेत त्यांच्या “लॉकडाउन जिंदगी ” ह्या चित्रपटासाठी हिराज प्रॉडकशन गोंदिया च्या वतीने आमंत्रित करण्यात आले, कार्यक्रमात सुदर्शन लांडेकर आणि त्यांच्या सहकलाकारचा सुद्धा यात सत्कार करण्यात आला.


ह्या कार्यक्रमात उदघाटक म्हणून विनोद अग्रवाल ( आमदार गोंदिया ), विनोद जयस्वाल (निर्माता अविरल फिल्मस ), राजेशजी कापसे ( निर्माता आर. के. फिल्म्स ), दिनेश फरकुंडे ( निर्माता हिराज प्रॉडकशन ), योगेश लिपने ( संस्थापक अध्यक्ष मराठी टॅलेंट चित्रपट संघटना ), अतुल कुडवे ( दिग्दर्शक ए. एम. एच. मुंबई ), शिवा बागुल (दिग्दर्शक एस. के. प्रॉडकशन पुणे ), अशोकजी गुप्ता, भावनाताई कदम, घनश्याम पानतावने, मनमितसिंग नैय्यर, डॉ. वंदन नखाते ( अभिनेता ), चिरंजीव गद्दामवार ( अभिनेता ), होते या कार्यक्रमासाठी दिनेशजी फरकुंडे (निर्माता ), दिलीपजी कोशरे ( निर्देशक )
यांच्या खुप परिश्रम घेतला होत.
सुदर्शन लांडेकर यांनी आपल्या यशाचे श्रेय आपल्या परिवाराला, मित्रमंडळीला, आपल्या सहकलाकाराला आणि आयोजकला दिलं आहे

Share