गोंदिया पोलिस दलातर्फे देवरी, सालेकसा, नवेगाव बांध येथे भव्य रोजगार मेळावा

पोलिस विभागाद्वारे सुशिक्षित तरुण तरुणीसाठी रोजगाराच्या संधी

देवरी 15- गोंदिया जिल्हा पोलिस दलाच्या सौजण्याने सुशिक्षित तरुण तरुणीसाठी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन दि – 16 ते 18 फेब्रुवारी 2021 ला करण्यात आले असून जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींनी सहभागी होण्याचे आग्रह करण्यात आलेले आहे.

विशेष म्हणजे गोंदिया जिल्हातील नक्षलग्रस्त भागतील तरुण तरुणी आणि इतर नागरिकांनी नक्षलवादयाच्या भुलपाथाना बळी न पडता या रोजगार संधीचा फडा घेऊन आपले जीवन चांगले जगावे व शहसनच्या मुखी प्रवाहात सामील व्हावे असे आवाहन पोलिस अधीक्षक विश्व पानसरे आणि अतुल कुलकर्णी अप्पर पोलिस अधिक्षक देवरी यांनी केलेले आहे. सदर रोजगारचे आयोजन

दि- 16-02-2021 ला पोलिस स्टेशन देवरी , चीचगड , दुग्गिपार हद्दीतील युवक युवतींची मुकाखत मुलाखत स्थळ-क्रीडा संकुल मैदान देवरी

दि 17-02-2021 ला केशोरी , अर्जुणी मोर , नवेगाव बांध हद्दीतील युवक युवतींची मुकाखत मुलाखत स्थळ- पोलिस स्टेशन नवेगाव बांध

दि 18-02-2021 ला सालेकसा व गोंदिया जिल्हातील उर्वरित पोलिस स्टेशन हद्दीतील युवक युवतींची मुकाखत मुलाखत स्थळ-क्रीडा संकुल मैदान सालेकसा

उमेदवारांनी अद्यावत बायोडाटा, दोन कलर फोटो , आधार कार्ड , मुळ शैक्षणिक कागद पत्रे सोबत आणावे असे आवाहन करण्यात आलेले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share