गोंदिया :राज्य सरकारने पोलीस उपअधीक्षक (Deputy Superintendent of Police – DYSP) आणि समकक्ष दर्जाच्या तब्बल ११५ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदस्थापना जाहीर केल्या आहेत. गृह विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार राज्यातील विविध जिल्हे, पोलीस आयुक्तालये आणि विशेष शाखांमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत.
राज्याच्या गृह विभागाने अगदी टोकाचा निर्णय घेत थेट वरपर्यंत सर्वच स्तरातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित केले असून गेल्या काही महिन्यांपासून पेंडिंग असलेल्या पोलिस उपअधीक्षक यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. यात गोंदिया जिल्ह्यातील ४ एसडीपीओंचे स्थानांतरण करण्यात आले आहे. यामध्ये गोंदियाच्या रोहीणी बानकर,तिरोड्याचे साहिल झरकर , आमगावचे प्रमोद मडामे आणि देवरीचे विवेक पाटील यांचा समावेश आहे.
















