गोंदिया : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या तिकीट दरामध्ये १५ एप्रिल पासून १० टक्के हंगामी भाडे वाढ करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. त्यामुळे उन्हाळी सुट्टयांमध्ये गावाला जाताना प्रवाशांना अतिरिक्त पेसे मोजावे लागणार आहेत. या भाडेवाढीमुळे एसटीच्या लांबपल्ल्याचा प्रवास ९० ते १०० रुपयांनी महागणार आहे.
ही हंगामी भाडेवाढ १५ एप्रिलच्या मध्यरात्री पासून सुरु होणार असून १५ जून पर्यंत राहणार आहे. ही वाढ साधी, मिडी बस, जलद (साधारण) रात्रसेवा या बसेसेवेसाठी लागू राहणार आहे. अधिकाऱ्यांनी सांगीतल्यानुसारनव्या भाडेवाढीनुसार प्रवाशांना प्रति टप्पा भाडे किमान भाडे प्रौढ प्रवाशांसाठी १२ रुपये तर लहान मुलनांसाठी ७ रुपये असणार आहे. उन्हाळी हंगामातील गर्दीतून उत्पन्न वाढीसाठी महामंडळ दरवर्षी हंगामी भाडेवाढ करते. गेल्यावर्षी दिवाळीमध्ये एसटी महामंडळाने जाहीर केलेली १० टक्के हंगामी भाडेवाढ नागरिकाच्या रोषामुळे रद्द केली होती. दरम्यान आता पुन्हा भाडेवाढ मागे घेण्याची नामुष्की एसटी महामंडळावर ओढवू शकते असे जाणकारांचे म्हणणे आहे.
हंगामी भाडेवाढ:
साध्याबसचे सध्याचे तिकीटाचे दर प्रतिटप्पा १० रूपये ०५ पैसे असे असून हंगामी तिकीट दर ११ रुपये ०५ पैसे असे राहणार जलद बसची सध्याची तिकीट प्रतिटप्पा १० रूपये ५ पैसे असून हंगामी तिकीटाचे दर ११ रुपये ०५ पैसे असे राहणार आहे.








