देवरी: देवरी तालुक्यातील लोहारा येथील शिवसेना(उबाठा) पक्षाचे देवरी तालुका प्रमुख सुनिल मिश्रा यांची लोक कला सेवा मंडळ (ऑल इंडिया) च्या गोंदिया जिल्हा अध्यक्ष या पदी आपली निवड करण्यात येत आहे.
हि निवड लोक कला सेवा मंडळाचे ऑल इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. राजकुमार घुले मंडळाची यांनी नुकतेच केले आहे.
प्रा. राजकुमार घुले यानी सादर केलेल्या नियुक्ती पत्रात लोक कला सेवा मंडळाची भुमिका आणि नियमांचे आपले कर्तव्य सुसघंत राहील, याची आपण मंडळास हमी द्यावी, आपन लोक कला सेवा मंडळच्या स्थानक/राज्यस्तरिय व राष्ट्रीय कार्यक्रमां मध्ये सहभागी होऊन सहकार्य कराल असे नियुक्ती पत्रात म्हटले आहे.
मंडळाच्या वतीने पुढील कार्यास आपणांस शुभेच्छा म्हटले आहे.
सुनिल मिश्रा यांच्या या निवडी बद्दल शिवसेना (उबाठा) चे देवरी शहर प्रमुख राजा भाटिया, उप तालुका प्रमुख सुहाग गिरी, गोंविद बंसोड, धर्मेन्द्र जगनीक, डालचंद मडावी, विनोद गौर, किसान सेना तालुका प्रमुख संजय मेहर, विभाग प्रमुख लोकनाथ लांजेवार, प्रशांत यादव,
डॉ. भुमेश पटले, वरिष्ठ शिवसैनिक. योगेश पवार, शाखा प्रमुख लल्लूप्रसाद उपाध्याय, दिलीप सोनार, आनंद शेंद्रे, अमोल राऊत, मराज बावनकुळे, अजय गिरी, मनोहर मेश्राम, खुभराज टेटे, दिनेश डुंभरे, सुभास शाहू, महिला उप संघटीका शामलता पांडे यांच्यासह तालुक्यातील शिवसेना, युवासेना, महिला संघटन, किसान सेना व तसेच समस्त शिवसेनेचे संघटनेचे पदाधिकारी, शिवसैनिकांनी अभिनंदन केले आहे.









