देवरी:EMRS बोरगाव बाजार येथे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्ड परीक्षेची पूर्वतयारी व आत्मविश्वासाने परीक्षेत सामोरे कसे जाता येईल यासाठी NEST नवी दिल्ली व महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी नाशिक मार्फत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता 4 दिवस अभ्यास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या अभ्यास शिबिरात EMRS रामटेक (नागपूर) आणि EMRS बोरगाव बाजार (गोंदिया) या शाळेतील इयत्ता दहावीचे एकूण 110 विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. शिबिराच्या पहिल्या दिवशी उद्घाटन प्रसंगी खेडकर (मुख्याध्यापक, शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रम शाळा, बोरगाव बाजार), स्नेह अग्रवाल (टीजीटी गणित, नवोदय विद्यालय डोंगरगड़ जिल्हा राजनांदगाव), राजेश सावरकर (टी. जी. टी. गणित, नवोदय विद्यालय, डोंगरगड़), एकलव्य शाळेचे प्राचार्य गणेश कुमार तोडकर तसेच सर्व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व समारोप विजयकुमार मोरे व प्रियंका वाघमारे यांनी केले.
पहिल्या दिवशी सोमवारी रोजी गणित विषयाचे मार्गदर्शन तासिका झाले तर दुसऱ्या दिवशी ऋतुजा घुगे (विज्ञान, छत्रपती पब्लिक स्कूल, देवरी) यांनी विज्ञान विषयाचे मार्गदर्शन केले. शिबिराच्या तिसऱ्या दिवशी नरेश कुमार आणि नितीन रौथान (टी. जी. टी. समाजशास्त्र, EMRS बोरगाव बाजार) यांनी समाजशास्त्र विषयाचे मार्गदर्शन केले तर चौथ्या दिवशी शशिकला लांडगे (टीजीटी इंग्रजी, नवोदय विद्यालय नवेगाव बांध) यांनी विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचे मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे एकलव्य शाळेचे प्राचार्य गणेश कुमार तोडकर यांनी विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन केले. चार दिवसाचे अभ्यास शिबिर समारोप प्रसंगी उमेश काशीद (प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी गोंदिया) यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर मार्गदर्शन केले. आपले आदर्श विद्यार्थ्यांसमोर मांडून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढविण्यास मदत केली. सदर कार्यक्रमाच्या निरोप प्रसंगी तुलसीदास बगाडे (सहायक प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी), पालक-शिक्षक समितीचे सदस्य अमृता पुराम व एकलव्य शाळेचे प्राचार्य गणेश कुमार तोडकर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शिबिराचे शेवट तसेच मान्यवरांचे आभार दत्ता लिंबोरे (अधीक्षक EMRS बोरगाव बाजार) यांनी केले.









