देवरी : राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०, राज्य अभ्यासक्रम आराखडा २०२४ तसेच शासननिर्णय क्रमांक संकीर्ण २०२४/प्र.क्र.१०/एसडी-६ मंत्रालय, मुंबई दिनांक १५ मार्च २०२४ (SQAFF) यानुसार राज्यातील सर्व शिक्षण संस्थांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, अधिकारी व शिक्षण विभागातील अधिकारी-कर्मचारी यांच्या शैक्षणिक, प्रशासकीय कौशल्यवृद्धीसाठी तसेच समन्वय, सहकार्य व स्पर्धात्मकतेची भावना निर्माण करण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा उद्घाटनीय शुभारंभ महेंद्र मोटघरे गटशिक्षणाधिकारी देवरी यांच्या हस्ते पार पडला असून यावेळी यशस्वी आयोजनसाठी ओ एस ठवळे शि. वि. अधिकारी , धनवंत कावळे गट समन्वयक , व्ही डब्लू लोथे विषय तज्ञ , मस्के , शेंद्रे, भरणे , वाल्थरे, सिंगांजूडे , शहारे महत्त्वाची भूमिका बजावली.
सदर कार्यक्रमात खोखो , वॉलीबॉल, भालाफेक , थालिफेक, लांब उडी , उंच उडी , बॅडमिंटन आदी क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. यामधे पंचाची भूमिका सुनील काळे, कठाणे, भोयर , टेंभरे , लांजेवार, राऊत आदी अनुभवी मान्यवरानी पार पाडले. तसेच कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजनात केद्रप्रमुख एच जी राऊत , एम एम राऊत , के गभने, डी एस भोयर आदी मंडळीनी पार पाडले.









