देवरी : छत्रपती शिवाजी ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन, देवरी (D.T.Ed. 2009–2011) च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा (Get Together) नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नवेगाव येथे मोठ्या उत्साहात पार पडला. तब्बल १४ वर्षांनंतर सर्व सहाध्यायी एकत्र येऊन शिक्षणकाळातील सुवर्ण आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रमाला त्या काळातील प्राध्यापकवर्ग — विनोदकुमार माने, संतोष पटले, प्रशांत गिर्हेपुंजे,. संदीप बिसेन तसेच ममता टेंभुर्णीकर विशेष उपस्थित होते. प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्या काळातील गमतीजमतींना उजाळा दिला. विद्यार्थ्यांनीही आपल्या शिक्षणकाळातील अनुभव, वर्गातील हास्यविनोद आणि शिक्षकांसोबतच्या आठवणी शेअर करून भावनिक वातावरण निर्माण केले.
सनेहमेळाव्याचे सूत्रसंचालन भूमेश साखरे आणि मनोजकुमार पेटकुले यांनी कौशल्यपूर्णरीत्या केले, तर आभार प्रदर्शन दिपाली मानकर यांनी केले. काही विद्यार्थी तब्बल ५०० कि.मी. अंतरावरून विशेषतः या स्नेहमेळाव्यासाठी आले होते, ही बाब सर्वांना भावणारी ठरली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रागिणी धरमशहारे यांनी विशेष पुढाकार घेतला, तर त्यांना वर्षा लांजेवार, नरेश वैद्य, नरेंद्र मेंढे, राकेश टेंभुर्णीकर, अमित सिरसाम आणि इतर सर्व विद्यार्थ्यांचे सक्रीय सहकार्य लाभले.निसर्गरम्य नवेगाव राष्ट्रीय उद्यानाच्या सान्निध्यात झालेल्या या स्नेहमेळाव्यात हास्य, आनंद आणि भावना यांचे सुंदर मिश्रण पाहायला मिळाले. जुन्या आठवणींनी अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणले, आणि नव्या भेटीत मैत्रीचा बंध अधिक दृढ झाला. शेवटी सर्वांनी दर काही वर्षांनी असा स्नेहमेळावा आयोजित करण्याचा संकल्प व्यक्त केला.









