देवरी : राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० आणि राज्य अभ्यासक्रम आराखडा २०२४ च्या पार्श्वभूमीवर शिक्षकांच्या शैक्षणिक कौशल्यवृद्धीसाठी देवरी येथे “गुरुजींची शैक्षणिक साहित्यांची स्पर्धा ” हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात स्थानिक शिक्षकांनी विविध शैक्षणिक साधनांचा उपयोग करून अध्यापन अधिक प्रभावी, आनंददायी आणि सृजनशील करण्याचे प्रयोग सादर केले. या निमित्ताने शिक्षकांनी स्वतः तयार केलेली शिक्षणसामग्री, मॉडेल्स, चार्ट्स, डिजिटल साधने आदींचे प्रदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ओमप्रकाश ढवळे शि वि अधिकारी, परीक्षक आणि निरीक्षक म्हणून एच जी राऊत सेवा निवृत्ती शि. वि. अधिकारी , आर. टी. शेंदरे , तांडेकर सर, अनिल मेश्राम, कु. निशा लांजेवार मॅडम, यशवंत दुधनाग यांनी जबाबदारी पार पाडली. या कार्यक्रमात स्थानिक शाळांतील शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षणप्रेमी उपस्थित होते. या उपक्रमाद्वारे शिक्षकांच्या नवोन्मेषी क्षमतांना प्रोत्साहन मिळाले असून, शिक्षणाची गुणवत्ता अधिक उंचावेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.









