15 व्या वित्त आयोगाचा निधी लवकर मिळावा — सरपंच संघटनेची मागणी

देवरी :देवरी तालुका सरपंच संघटनेतर्फे इंद्रनील नाईक, राज्यमंत्री तथा पालकमंत्री गोंदिया जिल्हा यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे 15 व्या वित्त आयोगाच्या सन 2025-26 च्या निधीची ग्रामपंचायतींना लवकरात लवकर थकित रक्कम वितरित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, निधी थांबलेला असल्याने ग्रामपंचायतींच्या विविध विकासकामांमध्ये अडथळे निर्माण झाले आहेत. ग्रामपंचायतींना नियमित निधी मिळाल्यास विकासकामांना वेग येईल, असे सरपंच संघटनेचे म्हणणे आहे.या निवेदनावर देवरी तालुका सरपंच संघटनेतर्फे संबंधित पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या करण्यात आल्या असून, जिल्हा प्रशासनाने तातडीने निधी वितरित करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें