विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांचा गोपाल अष्टमी व दीपावली मिलन सोहळा संपन्न

देवरी : विश्व हिंदू परिषद बजरंग दल, प्रखंड देवरी यांच्या वतीने गोपाल अष्टमी / दीपावली मिलन सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, दिनांक १ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १२:०५ वाजता सुखई चौक वॉर्ड क्र. ०७, राम मंदिर पोलिस स्टेशन समोर, देवरी येथे करण्यात आले.या कार्यक्रमाला विश्व हिंदू परिषद प्रांत सहमंत्री देवेश मिश्र हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाचे उद्घाटन नविन जैन (बजरंग दल प्रांत संयोजक) यांच्या हस्ते झाले असून , प्रमुख अतिथी म्हणून मुकेश उपाध्याय (विश्व हिंदू परिषद, जिल्हा मंत्री) तसेच सुमित कोहळे (विश्व हिंदू परिषद, प्रांत सह मंत्री) उपस्थित होते .विशेष अतिथी म्हणून हर्षित अग्रवाल, बालराम व्यास, सुभाष पटेल, हार्दिक जिवानी, प्रणव मेश्राम , संध्या गाढवे हे उपस्थित होते.

या प्रसंगी दीपावली आणि गोपाल अष्टमीच्या निमित्ताने समाजात धार्मिक एकता, सांस्कृतिक चेतना आणि राष्ट्रभावना जागृत करण्याचा संकल्प करण्यात आला .कार्यक्रमाचे आयोजन विश्व हिंदू परिषद, बजरंग दल मातृशक्ती व दुर्गावाहिनी, देवरी प्रखंड यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें