देवरी : देवरी येथील सार्वजनिक विठ्ठल रघुमाई मंदिर, पंचशील चौक येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्तिक पौर्णिमा महोत्सव २०२५ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या महोत्सवात धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी भाविकांसाठी आयोजित करण्यात आली आहे.मंगळवार, दि. ४ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजता ज्योति प्रज्वलन करून महोत्सवाची सुरुवात होईल. त्यानंतर रात्री ८.०० वाजता भजन कार्यक्रम होणार आहे.
बुधवार, दि. ५ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १२.०० ते ३.०० या वेळेत गोपाळकाला कार्यक्रम होईल. त्यानंतर संध्याकाळी ६.०० वाजल्यापासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.या धार्मिक सोहळ्यात सर्व भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सार्वजनिक विठ्ठल रघुमाई मंदिर समिती, देवरी तर्फे करण्यात आले आहे.









