विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांचा गोपाल अष्टमी व दीपावली मिलन सोहळा आज

देवरी : विश्व हिंदू परिषद बजरंग दल, प्रखंड देवरी यांच्या वतीने गोपाल अष्टमी / दीपावली मिलन सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, दिनांक १ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १२:०५ वाजता सुखई चौक वॉर्ड क्र. ०७, राम मंदिर पोलिस स्टेशन समोर, देवरी येथे करण्यात आले आहे.या कार्यक्रमाला विश्व हिंदू परिषद प्रांत सहमंत्री देवेशजी मिश्र हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमाचे उद्घाटन नविनजी जैन (बजरंग दल प्रांत संयोजक) यांच्या हस्ते होणार असून, प्रमुख अतिथी म्हणून मुकेशजी उपाध्याय (विश्व हिंदू परिषद, जिल्हा मंत्री) तसेच सुमितजी कोहळे (विश्व हिंदू परिषद, प्रांत सह मंत्री) उपस्थित राहणार आहेत.विशिष्ट अतिथी म्हणून हर्षितजी अग्रवाल, बालरामजी व्यास, सुभाषजी पटेल, हार्दिकजी जिवानी, प्रणवजी मेश्राम हे उपस्थित राहणार आहेत.

या प्रसंगी दीपावली आणि गोपाल अष्टमीच्या निमित्ताने समाजात धार्मिक एकता, सांस्कृतिक चेतना आणि राष्ट्रभावना जागृत करण्याचा संकल्प करण्यात येणार आहे.कार्यक्रमाचे आयोजन विश्व हिंदू परिषद, बजरंग दल मातृशक्ती व दुर्गावाहिनी, देवरी प्रखंड यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले असून, सर्व समाजबंधूंनी या कार्यक्रमास उपस्थित राहून धार्मिक ऐक्याचा संदेश द्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

स्थान: सुरभी चौक, वॉर्ड क्र. ०७, राम मंदिर पोलिस स्टेशनसमोर, देवरी

📅 दिनांक व वेळ: शनिवार, १ नोव्हेंबर २०२५, दुपारी १२:०५ पासून

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें