देवरी: सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त ‘Run For Unity’ हा कार्यक्रम राष्ट्रीय एकता दिवसाचे (३१ ऑक्टोबर) प्रतीक आहे. हा कार्यक्रम पोलीस स्टेशन देवरी येथे आयोजित करण्यात आला होता. त्याच उद्देशाने सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताच्या एकता आणण्यासाठी केलेल्या कार्यांची आठवण करून देणे आणि एकता व एकजुटीची भावना वाढविणे हे आहे.
या अनुषंगाने सदर कार्यक्रम प्रमोद मडामे , उपविभागीय पोलीस अधिकारी, आमगांव (अतिरिक्त कार्यभार देवरी) यांच्या उपस्थितीत, मुकेश राठोड , सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन देवरी, सपोनि. ओमप्रकाश गेडाम , पो.उ.नि. मिलिंद गेडाम , मपो.उ.नि. कु. गीता मुळे व इतर ७ अधिकारी, ७० पोलीस अंमलदार व १२५ विद्यार्थी नागरिक, पोलीस पाटील, पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणार्थी, शालेय विद्यार्थी तसेच फॉरेस्ट ऑफिस देवरी येथील १६ कर्मचारी (एकूण ३००) यांच्यासह पोलीस स्टेशन देवरी ते एमआयडीशी पळत जाऊन आपली उपस्थिती नोंदविली. तसेच सदस्यांच्या कार्यक्रमांनंतर सहभोजन झाल्यानंतर चहा नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली.‘Run For Unity’ करता उपस्थित असलेल्या सर्व बालक, युवक, सुजाण नागरिकांमुळे सदर कार्यक्रमाचा उत्साह वाढून जनता आणि पोलीस यांच्यातील नाते अधिक घट्ट होण्यास मदत झाली. समाज उपयुक्त आरोग्यदायी मार्गदर्शन करणारा कार्यक्रम ठरला.
सदर कार्यक्रम गोरख भामरे , पोलीस अधीक्षक गोंदिया यांच्या आदेशान्वये अभय डोंगरे, अप्पर पोलीस अधीक्षक गोंदिया कॅम्प देवरी व विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी व प्रवीण डांगे, पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन देवरी यांच्या मार्गदर्शनात पार पडला









