क्रीडा संकुल देवरीच्या क्रीडांगणावर होणार भव्य समारंभ
देवरी: देशाचे राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’च्या निर्मितीला १५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने ३१ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर या कालावधीत राज्यातील शाळांमध्ये वंदे मातरम् या गीताच्या सर्व कडव्यांचे गायन, गीताचा इतिहास सांगणाऱ्या प्रदर्शनाचे आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सदर कार्यक्रमाचे आयोजन औद्योगिक प्रशिक्षण संस्था देवरी यांच्या नेतृत्वात विविध विभागाचे शासकीय अधिकारी, विविध क्षेत्रातिल प्रतिनिधि , स्थानिक जनप्रतिनिधि यांच्या उपस्थिति क्रीड़ा संकुल देवरी यांच्या क्रीडांगणत पार पडणार आहे. यावेळी तालुक्यातील सर्वच लोकांनी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमात आपली हजेरी लावण्याचे आवाहन वंदे मातरम समितीने केले आहे.
दिनांक ७ नोव्हेंबर २०२५ ला सकाळी ९.३० ते १०.३०
९.३० ते ९.४५ : उद्घाटन, प्रस्तावना आणि मान्यवरांचा सत्कार
९.४५ ते १०.०० :लघु नाटिका सादरीकरण
१०.०० ते १०.१० :कार्यक्रम अध्यक्षांचे भाषण
१०.१० ते १०.३० :मुख्य वक्त्याचे भाषण
१०.३० ते १०.३५: समूहगायन – संपूर्ण वंदे मातरम्
१०.३५ ते १०.४०:आभार आणि समारोप
या पद्धतीने कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आलेले आहे.
शालेय शिक्षण विभागाचे अवर सचिव अ. रा. कुलकर्णी यांनी शिक्षण आयुक्तांना या संदर्भातील सूचना परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत.राज्य मंडळाच्या शाळांना सध्या दिवाळीची सुटी संपून ३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू होणार आहेत. तर, सीबीएसई, आयसीईएसई अशा अन्य मंडळांशी संलग्न शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे दुसऱ्या शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीलाच शाळांमध्ये उपक्रम आयोजित करावा लागणार आहे.बंकिमचंद्र चट्टोपाध्याय रचित ‘वंदे मातरम्’ या भारताच्या राष्ट्रीय गीताच्या निर्मितीला ३१ ऑक्टोबर, २०२५ रोजी तिथीनुसार म्हणजेच कार्तिक शुद्ध नवमीला, दैनंदिन वापरातील ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार ०७ नोव्हेंबर, २०२५ रोजी ‘वंदे मातरम्’ या गीताच्या निर्मितीला १५० वर्षे पूर्ण होत आहेत. राज्यातील शाळांमधून रोज वंदे मातरम् या गीताची पहिली दोनच कडवी गायिली जातात. मात्र, १५० वर्षपूर्तीचे औचित्याने ३१ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर २०२५ या कालावधीदरम्यान राज्यातील सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये ‘संपूर्ण वंदे मातरम्’चे गायन होण्याबाबत, तसेच ‘वंदे मातरम्’ या गीताचा इतिहास सांगणारे प्रदर्शन शाळांच्या दर्शनी भागात लावण्याबाबत राज्यातील सर्व शाळांना सूचना देण्याबाबत शिक्षण आयुक्तांना दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.









