शेकऱ्यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
ककोडी:(मनीष मोटघरे) देवरी तालुक्यातील ककोडी परिषरातील उचेपुर, महाका , जबकसा, मिसपिरी , चिपोटा , लेंडीजोब, चिल्हाटी, तुमडीकस अशा 25 गावातील धान पिक मावा , तुर्तूडा, गंदी बाग , माईट या रोगाने ग्रासले आहे.परिसरातील खरीब हंगामात शेतकरी धान पिकावर अबलंबून असतो. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका नेहमी जुन ले ऑक्टोबर महिन्यापर्यंत पावसाच्या तडाख्याने बसत आहे सतत हवामानात होणारा बदलाने भात पिकावर निरनिराळे रोगांचे प्रादुर्भाव होत आहे.
याविषयी ककोडी येथील शेतकर मन्नेंद्र मोहबन्सी तालुका उपाध्यक्ष भा रतीय जनता पार्टी देवरी, आकाश चव्हाण, गब्बर गोस्तानी यांनी जिल्हाधिकारी गोंदिया यांना निवेदन दिले. यामधे कृषी विभागाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी केली आहे.








