देवरी : शेतकऱ्यांचे बेहाल, चुकारे रखडलेले, महागाईचा मोठा फटका , रासायनिक खतांचे भाव ४ पट वाढलेले , विजेचे बिल दुप्पट असतांना, महावितरणच्या ग्राहकांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारे पाठविण्यात आलेल्या संदेशामुळे स्मार्ट मीटरबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. ज्यांच्या घरी अद्याप स्मार्ट मीटर बसविण्यात आलेले नाही, त्यांचे विद्यमान मीटर ४८ तासांनंतर बदलून स्मार्ट मीटर बसविण्यात येणार असल्याची पूर्वसूचना या संदेशातून देण्यात आली आहे. मीटर बदलण्याची प्रक्रिया पूर्णपणे मोफत असल्याचेही महावितरणने स्पष्ट केले आहे. दरम्यान अनेकांचा या मीटरला विरोध असतांनाही या संदेशाने पून्हा राज्यात वाद पेटण्याची चिन्ह आहेत.
राज्यात एकीकडे उन्हाळ्यामध्ये विजेचा वापर वाढत चालला आहे. ग्रामीण भागामध्ये लोडशेडिंगचं प्रमाणही वाढलं आहे. अनेक भागांमध्ये विज खंडित होण्याचे प्रकार वाढत आहे. त्यामुळे लोकांनी महावितरणच्या दारात आंदोलन करण्याची वेळ आली. एकीकडे सेवेच्या नावाने बोंबाबोब असताना आता महावितरणकडून ग्राहकांना अल्टीमेटम दिला जात आहे. 48 तासांमध्ये स्मार्ट मिटर बदलून दिले जाणार, असा मॅसेज थेट व्हॉट्सअपवर पाठवला जात आहे.







