20 वर्षीय तरुणाची पुलावरून उडी घेऊन आत्महत्या

देवरी: तालुक्यातील पुराडा गावातील एका 20 वर्षीय तरुणाने बागनदी पुलावरून पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश मोहनकर (वय 20) हा पुराडा येथील रहिवासी होता. त्याने लोहारा मोहनतोला–पुराडा जोडणाऱ्या पुलावरून पाण्यात उडी घेत आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिक व संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून याबाबत पुढील तपास सुरू आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून मोहनकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावकऱ्यांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें